आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी, बारावीची परीक्षा घेतली जाते. त्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क अदा करावे लागतात. ही रक्कम विभागीय शिक्षण मंडळाकडे जमा केली जाते. त्यामुळे शिक्षण मंडळाला दरवर्षी विद्यार्थी शुल्कापोटी कोट्यवधीचा महसूल मिळताे. यंदाही दहावी ६ कोटी ७५ लाख ७८ हजार ७५० रुपये, तर बारावीच्या विद्यार्थ्यांनी भरलेले ६ कोटी ७३ लाख ५ हजार २०० रुपये असा एकूण १३ काेटी ४८ लाख ८३,९५० रुपये शुल्क मंडळाच्या खात्यात जमा झाले आहेत.
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावीची लेखी परीक्षा २ मार्चपासून, तर बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरु हाेणार आहे. दहावीचे प्रात्यक्षिक १० फेब्रुवारी, तर बारावीच्या १ फेब्रुवारीपासून प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारण्यात येते. ज्यात गुणपत्रिका, प्रमाणपत्र आदींचे शुल्कदेखील आकारले जाते. या शुल्कातूनच बोर्डाच्या खात्यात दरवर्षी कोट्यवधी रुपये जमा होतात.
त्यातूनच मंडळाचा खर्च भागवला जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यंदा विभागीय शिक्षण मंडळास दहावीच्या १ लाख ८० हजार २१० विद्यार्थ्यांचा ६ कोटी ७५ लाख ७८ हजार ७५०, तर बारावीचा एक लाख ६८ हजार २६३ विद्यार्थ्यांकडून ६ कोटी ७३ लाख ५ हजार २०० रुपये महसूल मंडळाच्या खात्यात जमा झाला आहे. यात एका विद्यार्थ्यांकडून दहावीसाठी ३७५, तर बारावीसाठी ४०० रुपये शुल्क आकारले जात आहे.
शुक्रवारपासून मिळेल प्रवेशपत्र शिक्षण मंडळास विद्यार्थी शुल्कातून मिळणाऱ्या पैशातूनच परीक्षेचे सर्व साहित्य, मंडळाची दैनंदिन खर्च, कर्मचारी अधिकाऱ्यांचे वेतन, पेन्शन खर्चही यातूनच भागवण्यात येतो. विद्यार्थ्यांना २७ जानेवारीपासून ऑनलाइन हॉलतिकिट मिळणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.