आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाज्योतीकडून फेलोशिप देण्यात येणाऱ्या केवळ २०० जागा पुरेशा नाहीत. ओबीसी, भटके-विमुक्त व इतर विशेष मागास प्रवर्गातील संशोधक विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. सारथीने सरसकट फेलोशिप दिली. त्यामुळे महाज्योतीकडूनही सरसकट फेलोशिप द्यावी, या मागणीसाठी संशोधक विद्यार्थ्यांनी महाज्योतीच्या विभागीय कार्यालयासमोर सोमवारी ठिय्या आंदोलन केले. औरंगाबादेतील विद्यार्थ्यांनी नागपुरातील मुख्यालयासमोरही निदर्शने केली. परिणामी संचालक मंडळाने बैठकीत ३१ हजार ते ३५ हजार रुपये दरमहा फेलोशिप देण्याचा निर्णय घेतला आहे.
बार्टी व सारथी या दोन्ही संस्था संशोधक विद्यार्थ्यांना घरभाडे म्हणून पहिली दोन वर्षे ७,४४० दरमहा व नंतरच्या तीन वर्षासाठी ८,४०० देतात. आकस्मिक खर्च म्हणून पहिली दोन वर्षे १२ हजार तर पुढील तीन वर्षांसाठी २५ हजार दिले जातात. शिवाय ३ टक्के दिव्यांगांसाठी अतिरिक्त मदत म्हणून २ हजार दरमहा दिले जातात. सारथी व बार्टीकडून फेलोशिप मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही अधिक आहे. विद्यार्थी संख्येच्या तुलनेत महाज्योतीकडून संशोधक विद्यार्थ्यांवर अन्याय का, असा सवाल विद्यार्थ्यांनी आंदोलनाद्वारे उपस्थित केला आहे. त्यामुळे बैठकीत संचालक मंडळाने सकारात्मक निर्णय घेतला आहे. पीएचडी करणाऱ्यांना नोंदणीपासून पहिल्या दोन वर्षांसाठी ३१ हजार, तर तीन वर्षे ३५ हजार रुपयांसह घरभाडे भत्ता, आकस्मिक खर्चही देणार आहे.
महाज्योती विभागीय कार्यालयासमोर ठिय्या महाज्योती संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष बळीराम चव्हाण, विठ्ठल नागरे, विजय धनगर, आशिष लहासे आदींसह विद्यार्थ्यांनी नागपूर येथे मंत्री अतुल सावे यांची भेट घेतली. मुख्यालयासमोर विद्यार्थ्यांनी आंदोलनही केले. औरंगाबादेत अशोक जायभाये, देवानंद नागरे, रामप्रसाद सोनपीर, राम हुसे आदींसह संशोधक विद्यार्थ्यांनी समाजकल्याण उपायुक्त व महाज्योती विभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.