आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीड:विहिरीत आढळला बिबट्याचा मृतदेह,शिकारीच्या शोधात फिरतांना तोल जावुन विहिरीत पडल्याचा अंदाज

पाटोदाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पाटोदा तालुक्यातील महेंद्रवाडी परीसरातील शेतातील एका विहीरीत एक वर्षाचा नर जातीचा बिबटया मृत अवस्थेत बुधवार २४ मार्च २०२१ रोजी आढळुन आला आहे.
तालुक्यातील गारमाथा परीसरात महेंद्रवाडी शिवारातील एका विहीरीत मृतावस्थेत बिबटया आढळुन आला आहे. सदरील भाग हा नायगांव वनपरीक्षेत्राच्या हद्दीत असल्याने वनपरीक्षेत्र अधिकारी सायमा पठाण व वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.ग्रामस्थांच्या मदतीने मृत बिबट्या बाहेर काढण्यात येवुन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम राख, चौरे यांनी बीड येथुन तज्ञांना पाचारण करून जागेवरच शवविच्छेदन केले. भुकेने व्याकुळ झालेला बिबट्या शिकारीच्या शोधात फिरत असताना तो तोल जावुन विहीरीत पडला असावा त्याच्या अंगात त्राण राहिला नसल्याने त्याचा मृत्यु झाला असावा.

भुकेने अंगात त्राण नसल्याने मृत्यू
पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांनी बिबट्याचे पोस्टमार्टम केले आहे असुन अहवाल आल्यांनतरच बिबट्याच्या मृत्युचे कारण स्पष्ट होईल , विहीरीत पडून भुकेने अंगात त्राण नसल्याने मृत्यु झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे .-सायमा पठाण , वनपरीक्षेत्र अधिकारी ,पाटोदा

अहवाल आल्यांनतर स्पष्ट होईल
विषयीचे अचुक कारण समजण्यासाठी या बिबट्याच्या ऑरगन्स चे सँपल औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असुन तेथील अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल .- डॉ. बळीराम राख , पशुवैद्यकीय अधिकारी, पाटोदा

बातम्या आणखी आहेत...