आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शवविच्छेदनानंतरच कळेल मृत्यूचे कारण:दोन दिवसांपासून बेपत्ता विवाहितेचा मृतदेह आढळला

छत्रपती संभाजीनगर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन दिवसांपासून घर सोडलेल्या महिलेचा विद्यापीठाच्या मागील निर्मनुष्य परिसरात मृतदेह आढळला. मंगळवारी सायंकाळी हा प्रकार समोर आला. अनिता कचरू दाभाडे असे तिचे नाव आहे. मात्र, मृत्यूचे कारण बुधवारी शवविच्छेदनानंतरच कळेल, असे छावणी पोलिसांनी स्पष्ट केले.अनिता कुटुंबासह भावसिंगपुऱ्यात राहत होत्या. सोमवारी दुपारी त्यांनी घर सोडले. त्यांना मुलगा, मुलगी व पती असून ते खासगी काम करतात. मंगळवारी सायंकाळी विद्यापीठातील साई संस्थेच्या मागील परिसरातील निर्मनुष्य परिसरात एक महिला बेशुद्धावस्थेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिस ठाण्याचे निरीक्षक कैलास देशमाने यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांसह धाव घेतली. महिलेस घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. काही तासांत त्यांची ओळख पटल्यानंतर कुटुंबाला कळवण्यात आले. तेव्हा त्यांच्या चौकशीत अनिता यांनी सोमवारी घर सोडले हाेते. त्यानंतर त्या घरी परतल्या नव्हत्या.

बातम्या आणखी आहेत...