आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृतदेह:कायगाव येथील नदीत तरुणीचा मृतदेह ; एक-दोन दिवसांपूर्वीच मृत्यू झाल्याची शक्यता

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद-पुणे महामार्गावरील जुने कायगाव (ता. गंगापूर) येथील गोदावरी नदीच्या पाण्यात एका तरुणीचा मृतदेह तरंगताना शनिवारी (ता.११) सकाळी साडेदहा ते अकरा वाजेच्या सुमारास आढळून आला. बाबरगाव (ता. गंगापूर) येथील दिव्या अनिल दंडे (२२) असे मृत तरुणीचे नाव असल्याची ओळख पटली आहे. दिव्या ९ जूनपासून बेपत्ता झाली होती, तशी तक्रार दिव्याच्या कुटुंबीयांनी दिल्यापासून पोलिस तिचा शोध घेत होते. शनिवारी सकाळी एका तरुणीचा मृतदेह नदीपात्रात तरंगत असल्याची माहिती स्थानिकांनी कळवली. पोलिसांनी जाऊन पाहिले असता मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. एक-दोन दिवसांपूर्वी तिचा मृत्यू झाला असावा, अशी शंका व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी नातेवाइकांच्या परवानगीने डॉक्टरांना बोलवून शवविच्छेदन करून घेतले. नातेवाइकांनी जागेवरच अंत्यसंस्कार केले.

बातम्या आणखी आहेत...