आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:कालव्यात पडलेल्या आठ वर्षाच्या मुलाचा मृतदेह सापडला, औंढा नागनाथ येथील घटना

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

औंढा नागनाथ तालुक्यातील शिंदेवाडी शिवारातून कालव्यात पडलेल्या आठ वर्षीय मुलाचा मृतदेह सापडला असून या प्रकरणी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यास सोमवारी ता. २२ अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ तालुक्यातील शिंदेवाडी येथील मल्हारी शिंदे हे त्यांच्या कुटुंबियांसह शिंदेवाडी शिवारातील आखाड्यावर राहतात. रविवारी ता. २१ सकाळी त्यांचा मुलगा श्रीनिवास मल्हारी शिंदे (८) हा प्रातर्विधीसाठी कालव्याच्या जवळ गेला. यावेळी त्याचा पाय घसरून तो कालव्यात पडला. मात्र बराच वेळ होऊनही श्रीनिवाक आखाड्यावर का परतला नाही याचा त्याच्या कुटुंबियांनी शोध घेण्यास सुरवात केली. तर या घटनेची माहिती औंढा नागनाथ पोलिसांना दिली. पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली औढ्याचे पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे, जमादार संदीप टाक, निवृत्ती बडे यांच्या पथकाने घटनास्थळी शोध घेण्यास सुरवात केली. त्यानंतर गोळेगाव शिवारातील कालव्या जवळ जाळे लाऊन ठेवले होते. यामध्ये रविवारी ता. २१ रात्री उशीरा त्याचा मृतदेह घटनास्थळा पासून एक किलो मिटर अंतरावर असलेल्या गोळेगाव शिवारातील जाळ्यात अडकलेला आढळून आला. पोलिसांनी मृतदेह काढून उत्तरीय तपासणीसाठी औंढा ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह त्याच्या कुटुंबाच्या हवाली करण्यात आला. या प्रकरणी आज औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात नोंद घेण्याची प्रक्रिया सुरु होती.

बातम्या आणखी आहेत...