आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबाहेरून जाऊन येते, असे सांगून घराबाहेर पडलेल्या जनाबाई दगडू अहिरे (७१, रा. श्रद्धा कॉलनी, वाळूज) या बेपत्ता वृद्ध महिलेचा शोध घेणाऱ्या नातेवाइकांना अखेर वाळूजच्या उर्दू जिल्हा परिषद शाळेलगत रामराई शिवारातील विहिरीत मंगळवारी दुपारी १२:३० वाजता मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला.
मूळ सिल्लोड तालुक्यातील अहिरे कुटुंबीय उदरनिर्वाहासाठी वाळूजमध्ये येऊन श्रद्धा कॉलनीत स्थायिक झाले आहे. मंगळवारी जनाबाई बाहेर जाऊन थोड्याच वेळात परत येते, असे सांगून गेल्या होत्या. उर्दू जिल्हा परिषद शाळेलगत रामराई शिवारातील गट नंबर ३५८ मध्ये दशरथ मुळे व सय्यद कलीम यांच्या शेतातील विहिरीत रामनाथ डोंगरे व किसन पवार यांना मृतदेह तरंगताना दिसून आला.
त्यांनी वाळूज पोलिस ठाण्यात माहिती दिली. पोलिस उपनिरीक्षक सय्यद हनीफ, सहायक उपनिरीक्षक सखाराम दिलवाले यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, विहीर खोल असल्याने त्यांनी मनपा अग्निशमन विभागाला बोलावले. त्यानंतर जवानांनी मृतदेह बाहेर काढला. दरम्यान, महिलेजवळील पिशवीची तपासणी केली असता पोलिसांना मतदान ओळखपत्र व एक मोबाइल क्रमांक मिळून आला. पोलिसांनी संपर्क साधला असता, पुंडलिक दगडू अहिरे (रा. श्रद्धा कॉलनी, वाळूज) यांचा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना घटनास्थळी बोलावले. या वेळी पुंडलिक अहिरे यांनी माझी आई असून तिचे नाव जनाबाई अहिरे असल्याचे सांगितले. याप्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.