आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुसळधार पाऊस:वसई गावाजवळील पूल वाहून गेल्याने सात गावांचा संपर्क तुटला, हिंगोली जिल्ह्यात मोठा पाऊस

हिंगोली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरासह जिल्हाभरात  झालेल्या मुसळधार पावसामुळे वसई येथील पूल वाहून गेला आहे. यामुळे हिंगोली ते औंढा मार्गावरील वळण रस्त्यावरून पाणी वाहू लागल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. औंढा तालुक्यातील येहळेगांव मंडळात तब्बल 100 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

हिंगोली शहरासह जिल्हाभरात गुरुवारी  रात्री उशिरा जोरदार पावसाला सुरुवात झाली. जोरदार  पावसामुळे नदी व नाले तुडुंब भरून वाहू लागले होते. हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव मंडळात 80 मिलीमीटर व आजेगांव मंडळांमध्ये 67 मिलिमिटर पाऊस झाला आहे.  याशिवाय येहळेगांव सोळंके मंडळात येथे तब्बल 100 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

या पावसामुळे हिंगोली शहरानजीक असलेल्या वसई गावाजवळील पूल खचला असून या मार्गावरील सात गावांचा संपर्क तुटला आहे. वसई, खेड, कंजारा, पूर यासह इतर गावातील गावकऱ्यांना आता हिंगोली येथे येण्यासाठी पिंपळदरी - औंढा असा 40 किलोमीटरचा फेरा मारावा  लागणार आहे. शिवाय सेनगाव तालुक्यात जयपूर शिवारामध्ये एका आखाड्यावर वीज पडल्याने संपूर्ण आखाडा जळून खाक झाला आहे. यामुळे शेतकऱ्याची मोठे नुकसान झाले आहे. यासोबतच नदी नाल्या काठच्या पिकांना धोका झाला असून अनेक ठिकाणी दुबार पेरणी केलेली पिके वाहून गेली आहेत. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.

हिंगोली जिल्ह्यातील आतापर्यंत पडलेल्या तालुकानिहाय एकूण पाऊस  पुढील प्रमाणे हिंगोली तालुका 182 मिलिमीटर, कळमनुरी तालुका 135 मिलिमीटर, सेनगाव 189 मिलिमीटर, वसमत 126 मिलिमीटर तर औंढा नागनाथ तालुक्यात सर्वात जास्त 226 मिलिमीटर पाऊस पडला आहे.

बातम्या आणखी आहेत...