आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातो क्षण मला आजही आठवतोय...20 फेब्रुवारी 1947 तारीख होती, लंडनमध्ये ब्रिटिश पंतप्रधान क्लिमेंट अॅटलींनी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये घोषणा करून टाकली की जून १९४८ पूर्वी इंग्रज भारत सोडून जातील आणि सत्ता जबाबदार लोकांकडे सोपवली जाईल. हे ऐकताच स्वातंत्र्याच्या भावनेने मी हुरळून गेलो. १९ फेब्रुवारी १९४७ च्यार सकाळी व्हॉइसराॅय वॉव्हेल यांना लंडनहून एक गोपनीय तार आली. ते म्हणाले, शेवटी या लोकांनी आम्हाला पळवलेच... कारण नवे व्हॉइसराॅय लुई फ्रान्सिस अल्बर्ट क्विक्टर निकोलस माउंटबॅटन यांना स्वातंत्र्य देण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. तिकडे माझ्या कोट्यवधी लोकांच्या चेहऱ्यावर असे हास्य फुललेच होते, एवढ्यात डोळ्यांतून जणू रक्ताचे पाट वाहू लागले. कारण होते मोहंमद अली जिना. होय, हाच तो माणूस जो माझ्या छातीत खंजीर खुपसून माझे दोन तुकडे करण्यासाठी सरसावला होता. जिनांनी स्पष्ट सांगितले होते, आम्हाला फाळणी हवी... अन्यथा हा देश उद््ध्वस्त होईल.
फाळणीच्या माध्यमातून कशा प्रकारे भारतात द्वेषाची बीजे रोवायची, जेणेकरून देशाचा विनाश होईल आणि त्यांच्या चारित्र्याला डागही लागू नये, याचे गणित लंडनमध्ये बसून मजूर पक्षाचे प्रतिनिधी मांडत होते. १० डाउनिंग स्ट्रीट आणि बकिंगहॅम पॅलेसची झोप उडाली होती. कारण भारतीय आणि इंग्रज सैनिकांमधील मतभेद खूप ताणले गेले होते. रॉयल एअरफोर्सच्या इंग्रज अधिकाऱ्यांनी तर विद्रोह पुकारला होता. वस्तुत: १८ फेब्रुवारी १९४६ रोजी सुमारे २००० भारतीय नौदल सैनिकांनी विद्रोह केला होता आणि गोळीबारात सुमारे ४०० भारतीय सैनिक शहीद झाले होते. तेव्हापासूनच आतल्या आत राग दाटून राहिला होता. १९४६ मध्येच भारताला स्वतंत्र करण्याचे इंग्रजांनी निश्चित केले होते. हे लक्षात ठेवूनच २ सप्टेंबर १९४६ रोजी अंतरिम सरकार स्थापन झाले. त्याचे प्रमुख जवाहरलाल नेहरू होते. या अंतरिम सरकारमध्ये मुस्लिम लीग सहभागी झाला होता, परंतु १९४७ येता-येता आपल्या कारवायांनी त्याने जोरदार अंतर्गत विरोध निर्माण केला. परिणामी फेब्रुवारी १९४७ मध्ये नेहरूंचा धीर खचला आणि लीगच्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत, अशी त्यांनी मागणी केली. सरदार पटेल यांनीही कडक इशारा दिला. मुस्लिम लीगच्या सदस्यांनी तत्काळ कॅबिनेट सोडले नाही तर काँग्रेसचे सदस्य राजीनामे देतील, असे ते म्हणाले. तथापि, नव्या व्हाइसरॉयचे नाव आणि स्वातंत्र्याची तारीख निश्चित होण्याच्या घोषणेने तापलेले वातावरण काही दिवस शांत झाले होते. - उद्या वाचा : नवाबांच्या झोपा उडाल्या होत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.