आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी 1947चा हिंदुस्थान बोलतोय:इंग्रज आपल्या काळ्या कारभाराचे पुरावे जाळत होते, सरदार पटेल संस्थाने विलीन करण्यात व्यग्र होते

औरंगाबाद7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटिश सरकार हिंदुस्थानातून रवाना होण्याच्या तयारीत होते, त्याच वेळी इंग्रज अधिकारी आपल्या कृष्णकृत्यांचे पुरावे नष्ट करण्याच्या कामाला लागले होते. अनेक कार्यालये, शासकीय निवासस्थानांतून अचानक धूर निघू लागला होता, जो अनेक दिवस सुरू होता. काय जाळले, का जाळले, अधिकाऱ्यांजवळ याच्या अनेक कथा होत्या. मात्र हे निश्चित होते की इंग्रज आपल्या कृत्यांचा कोणताही दस्तएेवज मागे ठेवू इच्छित नव्हते. तिकडे संस्थानांबाबत सरदार पटेल आधीच सतर्क झाले होते. ते सातत्याने संस्थान आणि राजवाड्यांच्या प्रमुखांशी भेटत होते. त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत होते, हिंदुस्थानमध्ये समाविष्ट होण्याचे फायदे सांगत होते. सरदार पटेल यांचे पोलादी व्यक्तिमत्त्व आणि त्यांच्या दूरदृष्टीमुळेच सव्वाशेपेक्षा अधिक संस्थाने माझ्या विभाजनाच्या आधीच माझ्यात समाविष्ट होण्यास तयार झाली होती. देशात अनेक ठिकाणी अशांतता निर्माण झाली होती. बापूंना माहीत होते की मे महिन्याचा उकाडा या वेळी खूपच अधिक जाणवणार आहे. कदाचित यामुळे मेच्या सुरुवातीपासूनच ते राजकीय घडामोडींपासून दूर दिल्लीच्या झोपडपट्टीत लोकांमध्ये जाऊन बसले होते. देशाचे विभाजन करणाऱ्या इंग्रजांच्या कोणत्याही प्रस्तावाला काँग्रेसजनांनी मान्यता देऊ नये, अशी त्यांची इच्छा होती. इंग्रजांनी निघून जावे, नंतर जे होईल ते आपण पाहू, असे त्यांना वाटत होते. दरम्यान, स्वातंत्र्याची ‘माउंटबॅटन योजना’ लंडनला पोहोचली होती.

स्वातंत्र्याचा रोडमॅप व्हाइसराॅयकडून अॅटली सरकारकडे पोहोचण्याची ही पाचवी वेळ होती. तथापि, स्वातंत्र्याला वेडेपणा म्हणणाऱ्या व्हाइसराॅयने विभाजनाचाच रोडमॅप पाठवला होता. तो वाचल्यानंतर नेहरू अक्षरश: ओरडले होते - ‘सारा खेल खत्म हो गया।’ दुसरीकडे, ब्रिटिश पंतप्रधान अॅटली यांनी काही बदल करून माउंटबॅटन योजना परत पाठवली. हिंदुस्थानी नेत्यांना हा मसुदा मान्य नव्हता. माउंटबॅटन यांनी नेहरूंचे प्रिय व्ही. पी. मेनन यांची मदत घेतली. या योजनेला नेत्यांकडून मान्यता मिळाली. माउंटबॅटन सर्वकाही घेऊन लंडनला पोहोचले. मेननही सोबत होते. दोघे ३१ मे १९४७ रोजी दिल्लीला परतले. ते सर्व निश्चित झाले होते, ज्यासाठी गांधीजी इच्छा नसतानाही तयार झाले होते. आता विभाजनाच्या मसुद्यावर शिक्कामोर्तब होणे बाकी होते. - उद्या वाचा : चित्रपटजगताचेही विभाजन झाले

बातम्या आणखी आहेत...