आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:शहरातील नवीन वसाहतीत पोलीस कर्मचार्‍याचे फोडले घर; चोरट्यांचा शोध लावण्याचे गुन्हे शाखेसमोर आव्हान

हिंगोलीएका वर्षापूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक
  • पोलीस वसाहतच रामभरोसे

हिंगोली शहरातील नवीन वसाहतीमध्ये पोलीस कर्मचारी यांचे घर फोडून चोरट्यांनी पाऊण लाखाचा ऐवज पळवला. याप्रकरणी सोमवारी ता. 12 हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. आता चोरट्यांचा शोध लावण्याचे आव्हान स्थानिक पोलिसां समोर उभे राहिले आहे. शहरातील नांदेड रोड भागात पोलिसांची नवीन वसाहत आहे. या ठिकाणी सुमारे 168 निवासस्थाने असून एका इमारतीमध्ये आठ कुटुंबांसाठी निवासस्थाने आहेत. या ठिकाणी अधिकारी व कर्मचारी राहतात.

दरम्यान पोलिस वसाहतीच्या इमारत क्र. 4 मध्ये 30 क्रमांकाच्या निवासस्थानात पोलीस कर्मचारी रवी सावळे हे राहतात. पोलीस कर्मचारी सावळे काही दिवसापूर्वी कुटुंबासह नातेवाईकाकडे गेले होते. त्यांच्या घराला कुलूप असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी रविवारी ता 11 मध्यरात्री नवीन पोलीस वसाहतीमध्ये प्रवेश केला. इमारत क्रमांक चार मधील इतर सात कर्मचाऱ्यांच्या घराला बाहेरून कड्या लावून चोरट्यांनी पोलीस कर्मचारी सावळे यांच्या घराचा कुलूप कोयंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील सामानाची नासधूस केली. त्यानंतर लोखंडी कपाट फोडून त्यातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे पाऊन लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळवला.

दरम्यान रविवारी ता. 12 सकाळी इतर कर्मचारी जागे झाले असताना त्यांनी त्यांच्या घराचे दरवाजे उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र दरवाज्याला बाहेरून कडी लावण्याचा आल्याचे लक्षात आले. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी इतर इमारतीमधील कर्मचाऱ्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्या घराच्या कड्या उघडल्या. यावेळी पाहणी केली असता रवि साळवे यांच्या घराचे कुलूप तुटलेले दिसले. त्यामुळे त्यांच्या घरात चोरी झाल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसाचे घर फोडल्यामुळे संपूर्ण पोलिस यंत्रणा हादरून गेली. शहर पोलिसां सोबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी तसे तर त्यालाही पाचारण केले. याप्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान पोलिसाचे घर फोडल्यामुळे पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा छडा लावण्याचा सूचना वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या आहेत. मात्र मागील काही दिवसात किरकोळ कामगिरी करून स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला पोलिसाच्या घरामध्ये झालेल्या चोरीचा तपास लावता येणार का असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे.

पोलीस वसाहतच रामभरोसे
हिंगोली जिल्ह्यात चोरीच्या घटना रोखण्यासाठी व्यापारी व नागरिकांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आवाहन पोलिस विभागाने काही दिवसांपूर्वीच केले. मात्र पोलिस वसाहतीमध्येच सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे पोलीस वसाहतच रामभरोसे असल्याचे बोलले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...