आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेच्या बैठकीत रविवारी (१२ मार्च) व्यवस्थापन परिषदेसाठी निवडणूक होणार असून अर्थसंकल्पही मंजूर केला जाणार आहे. वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. वाल्मीक सरवदे वर्ष २०२३-२४ साठीचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. ८ पैकी ४ सदस्य बिनविरोध निवडून जातील. उर्वरित ४ जागांसाठी ९ जण रिंगणात आहेत. सकाळी ११ वाजता बैठक होणार आहे. बैठकीत १३ विषय आहेत. जुनी पेन्शन योजनेच्या (ओपीएस) विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. बामुक्टोचे डॉ. उमाकांत राठोड, डॉ. विक्रम खिल्लारे आणि डॉ. संजय कांबळे यांनी ओपीएसचा मुद्दा विषय पत्रिकेत घेण्यास प्रशासनाला भाग पाडले आहे. अधिसभा निवडणुकीनंतर ही पहिलीच बैठक आहे. त्यामुळे प्रश्नोत्तराचा तास वादळी ठरण्याची शक्यता आहे. शिवाय विधानसभेतील दोन तर विधान परिषदेतील एक असे तीन आमदार अधिसभेला उपस्थित राहून मतदानात भाग घेतील का..? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.