आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडेगाव, मिटमिट्यात दोन्ही सेनांमध्ये फोडाफोडी सुरूच:म्हस्के गेले तर शिंदेसेनेने संतोष आम्लेंना खेचले

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आमदार संजय शिरसाट यांच्या अखत्यारीत येणाऱ्या पडेगाव, मिटमिट्यात उद्धवसेना, शिंदेसेनेत फोडाफोडी सुरूच आहे.

गेल्या आठवड्यात शिंदसेनेत गेलेले शहर उपप्रमुख अंबादास म्हस्के ४८ तासांत स्वगृही परतले. त्यामुळे शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांना मोठा धक्का बसला होता. त्यामुळे त्यांनी पडेगावातील दिवंगत नगरसेवक रावण आम्ले यांचे बंधू संतोष आम्ले यांना शिंदेसेनेत खेचले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार शिरसाट यांच्या उपस्थितीत नागपूर येथे हा प्रवेश सोहळा झाला.

जंजाळ यांनी दबाब टाकून म्हस्केंना आमदार शिरसाटांकडे नेले होते, असेही म्हटले गेले. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी जंजाळ यांनी आम्ले यांचा प्रवेश सोहळा घडवून आणला. जंजाळ म्हणाले, की म्हस्के आमच्याकडे मनापासून आले होते. पण मनापासून गेले नाही. आम्ले आमच्यासोबत कायम राहतील. त्यांना पश्चिमचे शहरप्रमुखही करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...