आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्नितांडव:द बर्निंग डेपो...; 2 कचरा डेपोत 30 महिन्यांत 341 वेळेस अग्नितांडव

औरंगाबाद4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महानगरपालिकेच्या हर्सूल येथील कचरा डेपो सोमवारी भीषण आगीत भस्मसात झाला. याबाबत शहरात हळहळ व्यक्त होत असली तरी कचरा डेपोला आग लागण्याचे प्रकार शहराला नवीन नाहीत. २० महिन्यांत शहरातील ४ पैकी २ कचरा डेपांेना एक-दोन नव्हे तर चक्क ३४१ वेळेस आग लागली. यात कोट्यवधी रुपयांची यंत्रसामग्री व कचरा जळून खाक झाला असतानाच आग विझविण्यासाठी २०.८० लाख रुपयांचा खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे. नारेगाव येथील कचरा डेपो बंद झाल्यावर पालिकेने टप्प्याटप्प्प्याने चिकलठाणा, कांचनवाडी, हर्सूल आणि पडेगाव येथे कचरा डेपो व प्रक्रिया केंद्र उभारले. त्यापैकी सोमवारी हर्सूलच्या प्रक्रिया केंद्राला भीषण आग लागली. ‘दिव्य मराठी’चे वाचक आणि पर्यावरणप्रेमी सूरज अजमेरा यांना माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार प्रक्रिया केंद्रांना महिन्याला सरासरी ११ ते १२ आगीच्या घटनांना सामोरे जावे लागते.

चिकलठाण्यात २१२ आगी जानेवारी २०२० ते २० जून २०२० पर्यंत चिकलठाणा येथील डेपो व प्रक्रिया केंद्राला २१२ वेळेस आगी लागल्या. आग विझविण्यासाठी अग्निशमन विभागाला १० लाख ६० हजार लिटर पाणी लागले. अग्निशमनच्या बंबांना डेपोपर्यंत करावा लागणाारा प्रवास व पंप चालविण्यासाठी ३,१८,००० रुपयांचे डिझेल लागले. घटनेच्या तीव्रतेनुसार ५ च्या पुढेच कर्मचारी बंबासोबत जातात. या कर्मचाऱ्यांवर ९,७५,२०० रुपयांचा खर्च झाला. डिझेल व कर्मचारी मिळून २१२ घटनांसाठी १२ लाख ९३२०० रुपयांचा लागले.

उच्च न्यायालयात धाव घेणार ^कचऱ्यावर प्रक्रिया न करता तो जाळून टाकणे पालिकेला सोपे वाटते. यंत्रांचा विमा असल्याने त्यांची चिंता नसते. मात्र, यामुळे कचऱ्यावरील प्रक्रिया मंदावून शहराला त्रास सहन करावा लागतो. या प्रकाराला उच्च न्यायालय व राष्ट्रीय हरित लवादात जनहित याचिका दाखल करून आव्हान देणार आहे. - सूरज अजमेरा, पर्यावरणप्रेमी

बातम्या आणखी आहेत...