आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद-नगर महामार्गावर अपघात:वऱ्हाडींना घेऊन जाणाऱ्या बस व ट्रॅव्हल्सचा अपघात, दोन्ही वाहनांतील प्रवासी जखमी

गंगापूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद-नगर महामार्गावरील इसरवाडी फाट्याजवळ लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या बसचा आणि लॅक्सरी बसचा अपघात झाला आहे. गंगापूरजवळ हा अपघात झाला. अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून दोन्ही वाहनांतील 8 ते 10 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना प्राथमिक उपचारासाठी गंगापूर सरकारी रुग्णालयात नेले जात आहे. अपघात झाल्याने नगर-औरंगाबाद रोडवर वाहतुक कोंडी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भानस हिवरा तालुका नेवासा येथून लग्नाचं वऱ्हाड इसरवाडी मार्गे बीडकडे निघाले होते. त्यात बस ड्रायव्हरने अचानक ब्रेक मारल्याने पाठीमागून येणाऱ्या भरधाव लक्झरी बसने त्यांना धडक दिली. त्यात 8 ते 10 प्रवासी जखमी झाले आहेत. घटनास्थळी दोन रुग्णवाहिका दाखल झाल्या असुन जखमींना गंगापूर उप जिल्हा रुग्णालयात नेण्यात येत आहे.

अपघातावेळी लोकांनी केलेली गर्दी
अपघातावेळी लोकांनी केलेली गर्दी

वाहतुककोंडीमुळे औरंगाबादकडे जाणाऱ्या गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...