आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीलरशिप, ब्रोकरेज, ट्रान्सफरचा ठाकरे सरकारच्या काळात धंदा:चंद्रपूर, औरंगाबादच्या जाहीर सभेत भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा आरोप

औरंगाबाद/ चंद्रपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये १४१ जागांचे मिशन फत्ते करण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या सभांची महाराष्ट्रातून सुरुवात झाली. साेमवारी त्यांनी चंद्रपूर व औरंगाबादेत सभा घेतल्या.

यात नरेंद्र मोदी सरकारच्या आठ वर्षांतील जनहित योजनांची उजळणी करताना नड्डा यांनी ठाकरे सरकारच्या अडीच वर्षांतील कारभाराचा समाचारही घेतला. पंतप्रधान मोदींनी ‘डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर’द्वारे (डीबीटी) पारदर्शीपणे गरजूंना योजनांचा लाभ दिला, तर भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून सत्तेवर आलेल्या ठाकरे सरकारने डीलरशिप, ब्रोकरेज, ट्रान्सफरचा धंदा करून भ्रष्टाचार केला, असा आरोप जे.पी. नड्डा यांनी दोन्ही जाहीर सभांत केला. आता शिंदे-फडणवीस सरकार महाराष्ट्राला विकासात पुढे नेत असून जनतेने त्यांना साथ द्यावी, असे आवाहनही नड्डा यांनी केले.

राज्य सरकारला साथ देण्याचे आवाहन
चंद्रपुरातून मुनगंटीवारांचे, औरंगाबादेत कराडांचे नाव

नड्डांनी मोदी सरकारच्या कामाचा प्रचार करून साखरपेरणीच केली. चंद्रपूरमधून बलाढ्य उमेदवार म्हणून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार तर औरंगाबादेतून केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्याकडे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जात आहे.

देवेंद्र फडणवीस तापाने फणफणले
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दोन्ही सभांना अनुपस्थिती होती. मात्र गैरअर्थ निघू नये म्हणून प्रदेशाध्यक्ष बावनकुळे चंद्रपूरमध्ये म्हणाले, ‘रविवारी रात्री देवेंद्रजींना अचानक १०३ पर्यंत ताप आला. त्यामुळे ते येऊ शकले नाहीत.’

काँग्रेस, एमआयएमचा एकमेव खासदार असलेल्या दोन मतदारसंघांतून भाजपच्या प्रचाराचा श्रीगणेशा {चंद्रपूर : २००४ ते २०१९ सलग ३ टर्म भाजपचे हंसराज अहिर येथील खासदार होते. पण २०१९ मध्ये मोदी लाट असतानाही ते पराभूत झाले. काँग्रेसचा एकमेव खासदार बाळू धानोरकर निवडून आले. म्हणून या जागेवर भाजपचे आता विशेष लक्ष.

{औरंगाबाद : १९९८- ९९ चा अपवाद वगळता १९८९ ते २०१९ पर्यंत ही जागा शिवसेना-भाजप युतीकडे. पण २०१९ मध्ये चार टर्मचे शिवसेना खासदार खैरे एमआयएमकडून पराभूत. आता शिवसेनेशी युती तुटल्याने भाजपला प्रथमच हा मतदारसंघ लढवायचाय.

बातम्या आणखी आहेत...