आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासततच्या पावसाने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना भरपाई देण्याचा निर्णय नुकताच शिंदे-फडणवीस सरकारने घेतला. त्यानुसार मराठवाड्यातील शेतकऱ्यांना १५०१ कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. मराठवाड्यात अतिवृष्टीच्या शेतकऱ्यांना भरपाईपोटी १२१० कोटी रुपये देण्याचे आदेश १७ नोव्हेबरला निघाले होते. त्यानंतर आठवड्याभरात पैसे मिळणे अपेक्षीत असताना पुन्हा मोबाईल आधार क्रमांकसह याद्या बनवण्याच्या सुचना दिल्या. त्यात साडेचार महिन्यांचा वेळ गेला. त्यानंतर सततच्या पावसामुळे १९,७३,४४२ हेक्टरवर नुकसान झाले. तेव्हा निकषापेक्षा दुप्पट भरपाई देण्याची घोषणा नोव्हेंबरमध्ये झाली. मात्र, त्याचा निर्णय एप्रिलमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला.
१७ नोव्हेंबरला शासनाने १२१० कोटी रुपये मदतीचा आदेश काढला. त्यानुसार रक्कम वितरणाची तयारी महसूल यंत्रणा करत असतानाच शेतकऱ्यांकडून पुन्हा मोबाईल नंबर, आधार क्रमांक घ्यावा. तो तपासून, खात्री करून नव्या याद्या तयार कराव्यात. त्या तातडीने अपलोडही कराव्यात, असे आदेश काढण्यात आला. त्यामुळे यंत्रणेने त्यावर लक्ष केंद्रीत केले. एप्रिलच्या चार तारखेपर्यंत ८० टक्के याद्या पुर्ण झाल्या होत्या. त्यानुसार पैशाचे वाटप सुरु झाले आहे. आता पुुन्हा १७ लाख ५२ हजार १३८ शेतकऱ्यांचे मोबाईल व आधार क्रमांक गोळा करून, तपासून याद्या अपलोड कराव्या लागणार आहेत. पहिल्या याद्यांचा अनुभव लक्षात घेत नव्या यादीसाठी किमान दोन महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सप्टेबर ते ऑक्टोबरमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले. शासनाने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जशी एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुप्पट मदतीची घोषणा केली त्याच प्रमाणे सततच्या पावसाने केलेल्या नुकसानीची भरपाई देण्याची घोषणा केली. मात्र, अतिवृष्टीबाबतचा सरकारचा जीआर (शासन आदेश) १७ नोव्हेंबर २०२२ रोजी आला. त्यानंतर लगेच सततच्या पावसाचा जीआर येईल, अशी शेतकरी तसेच महसूल यंत्रणेची अपेक्षा होती.
यादीसाठी लागणार २ महिने उपग्रहाची मदत घेऊन भरपाईची रक्कम ठरेल पुढील वर्षी सरकारने सॅटेलाईट इमेजच्या (उपग्रह छायाचित्र) आधारे प्रत्येक शेतकऱ्याच्या नुकसानीचा अंदाज घेण्याचे ठरवले आहे. त्यामुळे सरसगट शेतकऱ्यांना मदत न मिळता ज्याचे जेवढे नुकसान झाले त्यांनाच भरपाईची रक्कम मिळणार आहे.
१७ नोव्हेंबरला शासनाने १२१० कोटी रुपये मदतीचा आदेश काढला. त्यानुसार रक्कम वितरणाची तयारी महसूल यंत्रणा करत असतानाच शेतकऱ्यांकडून पुन्हा मोबाईल नंबर, आधार क्रमांक घ्यावा. तो तपासून, खात्री करून नव्या याद्या तयार कराव्यात. त्या तातडीने अपलोडही कराव्यात, असे आदेश काढण्यात आला. त्यामुळे यंत्रणेने त्यावर लक्ष केंद्रीत केले. एप्रिलच्या चार तारखेपर्यंत ८० टक्के याद्या पुर्ण झाल्या होत्या. त्यानुसार पैशाचे वाटप सुरु झाले आहे. आता पुुन्हा १७ लाख ५२ हजार १३८ शेतकऱ्यांचे मोबाईल व आधार क्रमांक गोळा करून, तपासून याद्या अपलोड कराव्या लागणार आहेत. पहिल्या याद्यांचा अनुभव लक्षात घेत नव्या यादीसाठी किमान दोन महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सप्टेबर ते ऑक्टोबरमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले. शासनाने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जशी एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुप्पट मदतीची घोषणा केली त्याच प्रमाणे सततच्या पावसाने केलेल्या नुकसानीची भरपाई देण्याची घोषणा केली. मात्र, अतिवृष्टीबाबतचा सरकारचा जीआर (शासन आदेश) १७ नोव्हेंबर २०२२ रोजी आला. त्यानंतर लगेच सततच्या पावसाचा जीआर येईल, अशी शेतकरी तसेच महसूल यंत्रणेची अपेक्षा होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.