आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:छावणीत घाणीचे साम्राज्य,  जागोजागी कचऱ्याचे मोठे ढिगारे; नागरिकांविरुद्ध कारवाईचे आदेश

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

छावणी परिसरात सुभाष पेठ गणेश मंदिराशेजारील डीपीशेजारी कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. तसेच फिश मार्केटशेजारील महिलांच्या स्वच्छतागृहाच्या बाहेरही मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे ढीग साचले आहेत. छावणी परिषदेचे याकडे दुर्लक्ष होत आहे, अशी तक्रार करत परिसरातील नागरिकांनी कचऱ्याचे ढिगारे हटवून स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. दुसरीकडे, आम्ही दररोज कचरा संकलन करतो. मात्र काही नागरिक कचरा रस्त्यावर टाकतात. त्यामुळे अशा नागरिकांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे छावणी परिषदेने म्हटले आहे.

छावणी परिषदेअंतर्गत येणाऱ्या सात वाॅर्डांतील विविध भागांत कचरा योग्य प्रकारे उचलला जात नसल्याने रस्त्याच्या बाजूला कचऱ्याच्या ढिगाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. मोकाट कुत्रे व जनावरांचा या कचऱ्याच्या आसपास मुक्त संचार असतो. त्यामुळे पायी चालणाऱ्या नागरिकांनाही त्रास होतो. दुर्गंधीमुळे परिसरातील रहिवासी त्रस्त झाले आहेत. योग्य प्रकारे कचरा संकलन करण्यासह परिसरात रस्त्याच्या कडेला टाकलेला कचरा उचलण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.

रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांना दंड करू कचरा गाड्या विविध भागांत जाऊन कचरा संकलन करतात. काही लोक दुपारच्या वेळी रस्त्याच्या बाजूला कचरा टाकतात. त्यामुळे कचऱ्याचे ढीग झाले आहेत. आता कचरा टाकणाऱ्यांकडून दंड वसूल करण्यात येईल. - संतोष बन्सिले, कचरा संकलन निरीक्षक

बातम्या आणखी आहेत...