आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘समृद्धी’वर भरधाव कारचे चाक निखळले; दोन ठार:कार कलंडून तीन वेळा उलटली, तिघे गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

समृद्धी महामार्गावर बुधवारी सुसाट वेगात जाणाऱ्या कारचे अचानक चाक निखळून पडल्यानंतर कारचा भीषण अपघात होऊन दाेन मित्र जागीच ठार झाले. यात अन्य ३ जण गंभीर जखमी झाले. प्रतीक राजेंद्र देशमुख (२७, रा. सिद्धेश्वरनगर, जाधववाडी) आणि शेख अबीद अहमद जहीर अहमद (४२, रा. सिल्लोड) अशी मृतांची नावे आहेत.

प्रतीक देशमुख आणि सूर्यकांत वडणे हे दाेघे कारने (एमएच २० जीजे ९०९९) बुधवारी शिर्डीला गेले होते. शिर्डीवरून परतताना ते हर्सूल सावंगीच्या दिशेने निघाले. मात्र, महामार्गावर हर्सूल पोलिस ठाण्याच्या हद्दीत त्यांच्या कारचे चाक अचानक निखळले व कार कलंडली. कार त्यानंतर तीन ते चार वेळा उलटून रस्त्याच्या दुभाजकांवर जाऊन आदळली, असे पोलिसांनी सांगितले.