आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

50 व्या आंतरविभागीय नाट्य:एसटीच्या वाहक-चालकांनी आणले डोळ्यांमध्ये पाणी

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकरी कर्ज घेतो, मात्र नैसर्गिक संकटामुळे फेडू शकत नाही. अशातच जावईही आत्महत्या करतो. मग, सावकार मुलीवर अत्याचार करतो. सावकार शेतकऱ्याच्या पत्नीवरही हल्ला करतो. अंगावर शहारे आणणारे हे दृश्य पाहून सगळेच थबकले. उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू होते. हा प्रसंग होता एसटीतील कर्मचाऱ्यांनी साकारलेल्या ‘विठ्ठल-विठ्ठल’ नाटकातील.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कामगार कल्याण समितीच्या ५० व्या आंतरविभागीय नाट्य स्पर्धेतील कोल्हापूर संघाने सादर केलेल्या नाटकाने रसिकांची दाद मिळवली. लेखन निवृत्त लिपिक राजन पांचाळ यांनी तर दिग्दर्शन रमेश शिंगे यांनी केले होते.

भंगारातून उभे केले नेपथ्य
एसटी वर्कशॉपमधील भंगारातून नाटकासाठीचे नेपथ्य उभे केले होते. नैराश्यात गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना उभारी देणारा हा प्रयत्न आहे.- संतराम जाधव, मेकॅनिक, कोल्हापूर

अंगावर शहारे आले
प्रवासादरम्यान अनेकांशी संवाद घडताे. यातूनच नाटकातील पात्रे उभी राहतात. शेतकरी आत्महत्येच्या नाटकाने मनाचा ठाव घेतला. - नवनाथ घोडके, प्रेक्षक

बातम्या आणखी आहेत...