आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्सव:40 जणींच्या तिरुपती भजनी मंडळातर्फेरामकथा, देखण्या प्रसंगांनी रंगला सोहळा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एन-४ येथील तिरुपती महिला भजनी मंडळाने आयोजित केलेल्या रामकथेत शनिवारी ‘आले आले रघुवीर आता…’ म्हणत रामराज्याची स्थापना झाली. रामकथेचे वैशिष्ट्य म्हणजे महिलांनी आयोजित केलेल्या कथेमध्ये राजेश्वरी दीदी यांनी रामकथा सांगितली. सात दिवसांच्या या उत्सवासाठी आलेला ५ लाखांचा खर्चही महिलांनीच उभा केला, हे विशेष.

योगवर्गासाठी एकत्र येणाऱ्या मैत्रिणींनी महिन्यातून एक दिवस भजन गाण्याला २०१६ मध्ये सुरुवात केली. भक्ती आणि मैत्रीची गुंफण अशी झाली की पाहता पाहता त्यांना विविध ठिकाणी भजन कार्यक्रमाची आमंत्रणे येऊ लागली. सुखवस्तू कुटुंबातील महिला असल्याने भजन कार्यक्रमासाठी मिळालेले मानधन कुणीही स्वत:साठी मागितले नाही. जमलेल्या मानधनातून आध्यात्मिक उपक्रमच राबवावा असा विचार पुढे आला. यातूनच महिला भजनी मंडळाच्या भागवत सप्ताह, रामकथेची सुरुवात झाली. दरमहा पंढरपूरची वारीही या महिला मंडळाकडून काढण्यात येते.

दररोज ६ तासांची कथा
हा उत्सव आमच्या सर्वांचा असल्याने विवाहाप्रमाणे तयारी असते. प्रत्यक्ष कथा दररोज ६ तासांची असते, पण आयोजनासाठी ७ दिवस २४ तास काम करतो. मंडप, सजावटीशिवाय सगळेच आम्ही करतो.-रंजना कदम, उपाध्यक्ष

महिनाभरापासून करतो तयारी
या रामकथा उत्सवात आम्ही जिवंत देखावे करतो. या माध्यमातून आम्ही सगळेच कथेचा भाग बनतो. मुलांनाही यामध्ये संधी देतो. सप्ताहभर उत्साहाचे वातावरण असते. महिनाभरापासून यासाठी भाड्याने कपडे घेणे आणि तालीम सुरू असते. -क्षमा कुरे, सदस्य

पुढच्या पिढीचे देणे लागतो
अपघातानेच भजनी मंडळ स्थापन केले. यातून भावी पिढीसाठी भागवत कथा, रामकथेच्या माध्यमातून नैतिक मूल्ये, संस्कार करण्याचा आमचा उद्देश आहे. या कथेला परिसरातील नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळतो. -वैशाली जगताप, अध्यक्ष

बातम्या आणखी आहेत...