आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔषधनिर्माणशास्त्रातील पदविका आणि पदवी प्रथम अभ्यासक्रम प्रवेश सुमारे तीन महिने उशिराने झाले आहेत. त्यामुळे पदवी प्रथमच्या प्रथम सत्राचा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करण्याचे प्राध्यापकांसमोर टास्क आहे. पदविकेसाठी तर आठवड्यातून ३५ ऐवजी ४० तास शिकवणी घेण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने कॉलेजांना (एमएसबीटीई) दिले आहेत. वेळापत्रकातच तशी नोंद असून ३० मे ते १३ जूनदरम्यान परीक्षा घेतली जाईल.
फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाने औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयांचे मूल्यांकन करण्यात खूप उशीर केला. नव्या कॉलेजांची मान्यता आणि अभ्यासक्रम वाढ, तुकडीवाढ देण्यात दोन ते अडीच महिन्यांची दिरंगाई केली. त्यामुळे जानेवारीपर्यंत प्रवेश प्रक्रिया लांबली होती. आता पदवी प्रथम वर्षातील प्रथम सत्राच्या नियमित शिकवणीला सुरुवात झाली आहे. मात्र वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे प्राध्यापकांसमोर आव्हान असणार आहे. त्यासाठी अधिकच्या तासिका घेतल्या जात आहेत.
रविवारीही तासिका घेतल्या जात असल्याची माहिती प्राध्यापक आणि प्राचार्यांनी दिली आहे. दुसरे सत्र वेळेत सुरू करण्यासाठी प्रथम सत्राच्या शिकवणी, प्रात्यक्षिक, इंडस्ट्रियल व्हिजिट, औषधनिर्माण करणाऱ्या कंपन्यांचे अवलोकन करण्याचे शेड्यूल अतिशय वेगाने घेतले जात आहे. पदविका अभ्यासक्रम म्हणजेच डी. फार्मसीला सत्र पद्धत नसली तरीही त्यांना शैक्षणिक सत्र २०२३-२४ साठीचे नियोजन करणे गरजेचे झाले आहे. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने जारी केलेल्या शैक्षणिक वेळापत्रकात आठवड्यातील ३५ तासिकांऐवजी ४० तासिका घेण्याचे निर्देश दिले आहेत.
६ फेब्रुवारीपासून टेस्टला सुरुवात, ३० मे ते १३ जूनपर्यंत परीक्षा {आत्तापर्यंत झालेल्या शिकवणीच्या आधारे ६ ते १० फेब्रुवारीदरम्यान डी. फार्मसीची पहिली क्लास टेस्ट घेतली जाणार आहे. {दुसरी क्लास टेस्ट ३ ते ७ मार्चदरम्यान आणि तिसरी टेस्ट ८ ते १२ मेदरम्यान होणार आहे. वार्षिक परीक्षेसाठी १ ते १६ मार्चदरम्यान परीक्षा अर्ज स्वीकारले जातील. विलंब शुल्कासह १८ ते २२ मार्चपर्यंत परीक्षा अर्ज घेतले जातील. { १५०० रुपये पेनल्टी आणि विलंब शुल्कासह २४ ते २७ मार्च या तीन दिवसांत अर्ज घेतले जातील. {२१ ते २७ फेब्रुवारीदरम्यान प्रात्यक्षिक तर ३० मे ते १३ जूनपर्यंत लेखी परीक्षेचे वेळापत्रक जारी करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.