आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12 फेब्रुवारीला परीक्षा:गतवर्षी शिष्यवृत्तीचे घटलेले अडीच लाख परीक्षार्थी वाढवण्याचे आव्हान

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती देण्यासाठी दरवर्षी फेब्रुवारीत पाचवीसाठी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व आठवीसाठी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. कोरोनापूर्वी २०२० मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेला औरंगाबादसह राज्यभरातील पाचवीचे ५,७४,५८१ तर आठवीचे ३,९७,५२३ असे एकूण ९ लाख ७२ हजार विद्यार्थी बसले होते. मात्र, त्यानंतर कोरोनामुळे दोन वर्षे शाळा बंद होत्या. या दोन वर्षांत अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर गेले आहेत.

त्यामुळे त्यांना शिष्यवृत्ती परीक्षेबाबत माहिती मिळाली नसल्याने अडीच लाख विद्यार्थी संख्या घटली होती. २०२१ मध्ये पाचवीचे ४,१४,२४७ तर आठवीचे ३,०२,३१७ असे ७ लाख १६ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यामुळे फेब्रुवारी २०२३ मध्ये होणाऱ्या परीक्षेत विद्यार्थी नोंदणी वाढवण्याचे शिक्षण विभागासमोर आव्हान आहे. त्यामुळे शिक्षकांना तशा सूचना देण्यात आल्या.

कोरोनाचा सर्वाधिक फटका शैक्षणिक क्षेत्राला बसला आहे. हे शालेय ‌शिष्यवृत्ती परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थी संख्येवरून लक्षात येते. आता विद्यार्थ्यांना १५ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याची संधी असून १२ फेब्रुवारीला परीक्षा होणार आहे.

गेल्या वर्षीचा अंतरिम निकाल जाहीर गेल्या वर्षी झालेल्या परीक्षेचा अंतरिम निकाल नुकताच जाहीर झाला. यात पाचवीचे २३.९० टक्के, तर आठवीचे १२.५४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी राज्यभरातून ४ लाख १८,०५५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ३ लाख ८२,६९७ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट राहिले होते. त्यापैकी ९१,४७० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या ३ लाख ३, ८०९ पैकी २ लाख ७९ हजार ४६६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ३५ हजार ३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

पात्र विद्यार्थ्यांना अशी मिळते शिष्यवृत्ती इयत्ता पाचवीच्या परीक्षेतून पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना सहावी ते आठवीपर्यंत दरवर्षी १००० रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. इयत्ता आठवीच्या परीक्षेतून पात्र विद्यार्थ्यांना दहावीपर्यंत वार्षिक १५०० रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.

बातम्या आणखी आहेत...