आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Obc Reservation Maharashtrav | The Chaos In OBC Data Collection Should Be Stopped Immediately; The Government Should Take Responsibility For Maintaining The Political Reservation Of OBCs |marathi News

ओबीसी आरक्षण:डेटा गोळा करताना होत असलेली अनागोंदी तत्काळ थांबवावी; आरक्षणासाठी सरकारने जबाबदारी घ्यावी

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने जबाबदारी घ्यावी, ओबीसींचा डेटा गोळा करताना होत असलेली अनागोंदी तत्काळ थांबवावी, अशी मागणी माधवबनचे अध्यक्ष तथा निमंत्रक खुशाल मुंडे यांनी पत्रकार परिषदेत केली. पंकजा मुंडे यांच्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्याकडून सातत्याने उपहासात्मक टीका केली जात आहे. त्यांना राज्यसभा, विधान परिषदेच्या वेळी डावलले जात आहे.

त्यामुळे त्यांनी मौन सोडण्याची गरज असल्याचेही मुंडे म्हणाले. माळी, धनगर, वंजारी, बंजारा, नाभिक व इतर ओबीसी भटक्या विमुक्त संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष तथा निमंत्रक प्राचार्य खुशाल मुंडे यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात महात्मा गांधी भवनात रविवारी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. एम्पेरिकल डेटासाठी नेमून दिलेले कर्मचारी घरी बसून आडनाव पाहून डेटा तयार करत आहेत. अशा कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी.

पंकजांंना विधानसभेत पाडण्यात भाजपच्याच लोकांचा हात होता. २०१९ नंतर झालेल्या विधान परिषद, राज्यसभेमध्ये पंकजा मुंडेंनी जर मागणी केली नसती तरी त्यांना स्थान दिले नसते. भाजप नेतृत्वाकडून पंकजांबाबत आकसाची भावना दिसून येते. प्रदेशाध्यक्षांनी पंकजा मुंडेंना राष्ट्रीय नेत्या असल्याचे सांगत उपहास केला, असे खुशाल मुंडे म्हणाले. पत्रपरिषदेला गुलाबराव घोळवे, रवींद्र जायभाये, डॉ. मच्छिंद्र गोर्डे यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...