आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्य मंत्रिमंडळातील मंत्री भ्रष्टाचारप्रकरणी तुरुंगात जात आहेत. आता दिवंगत बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना राहिली नाही. त्यामुळे राज्यातील लोकांना महाविकास आघाडी सरकारपासून सुटका हवी आहे. षड्यंत्राद्वारे जनतेची लूट केली जात आहे. त्यामुळे भविष्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्य मंत्रिमंडळाची बैठक तुरुंगात घ्यावी लागेल, असा टोला भाजपचे राष्ट्रीय महासचिव तरुण चुग यांनी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेतून आयएमए हॉलमध्ये महाविकास आघाडीवर लगावला. भाजपच्या मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनिमित्त चुग शहरात आले होते. त्यांच्या हस्ते भाजयुमोच्या टीव्ही सेंटर येथील नामफलकाचे अनावरण झाले. याप्रसंगी भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार अतुल सावे, प्रदेश उपाध्यक्ष बसवराज मंगरुळे, शहराध्यक्ष संजय केणेकर, प्रवीण घुगे, इद्रिस मुलतानी, भगवान घडमोडे, दीपक ढाकणे उपस्थिती होते. राज्यात आघाडी सरकारकडून लूट सुरू आहे. भाजप २०२४ मधील विधानसभेच्या निवडणुकीत पूर्ण बहुमताने सत्तेवर येईल, असेही चुग म्हणाले. टीव्ही सेंटर चौकात भाजयुमोतर्फे नामफलकाचे अनावरण व मेळावा आयोजित केला हाेता. नुकतीच शिवसेनेच्या युवा मेळाव्यात हाणामारी झाली. या वेळी काळजी घेण्यात आली. प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, राजगौरव वानखेडे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. दुपारी ११ वाजेचा कार्यक्रम दीड तास उशिराने सुरू झाला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.