आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहुणे म्हणून आलेल्यांचा प्रताप:​​​​​​​स्पोर्ट््स बाइकवरून आलेल्या मुलांनी हिसकावून नेला पादचाऱ्याचा मोबाइल

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाहुणे म्हणून आलेल्या दोन अल्पवयीन मुलांनी दीड लाख रुपयांच्या स्पोर्ट््स बाइकवरून पायी जाणाऱ्यांचा मोबाइल हिसकावून पळवला. एका गुन्ह्यात तपास करत असताना एमआयडीसी सिडको पोलिसांच्या हाती दोन अल्पवयीन मुले लागल्यानंतर त्यांना ताब्यात घेत त्यांनी पळवून आणलेला एक आयफोन जप्त करण्यात आला. रोहित डोंगरे १६ डिसेंबरला धूत रुग्णालयाजवळ रस्त्याच्या कडेला मोबाइलवर बोलत असताना सुसाट वेगात आलेल्या स्पोर्ट््स बाइकवरील (एमएच २४ बीक्यू ७३१९) चोरांनी मोबाइल हिसकावून नेला.

एमआयडीसी सिडको पाेलिस ठाण्याचे निरीक्षक गौतम पातारे यांनी तपास सुरू केला. तेव्हा खबऱ्याकडून दोन लहान मुले नारेगावात मोबाईल विकण्यासाठी येत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यावरून उपनिरीक्षक आत्माराम घुगे यांनी सापळा रचला असता दोघेही अॅपल मोबाइलसह हाती लागले. ही केटीएम दुचाकी या मुलांच्या लातूरच्या नातेवाइकाची असून त्यावर ते औरंगाबादला नातेवाइकाकडे आले होते.

बातम्या आणखी आहेत...