आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुदतवाढ:शहर विकास आराखड्यास हवी 6 महिन्यांची मुदतवाढ

औरंंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराचा विकास आराखडा (डीपी प्लॅन) तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. अस्तित्वातील जागा वापर नकाशा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून महिनाभरात ईएलयू प्रसिद्ध केला जाणार आहे. मात्र तरीही दिलेल्या मुदतीत हे काम पूर्ण होत नसल्याने त्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात यावी, अशी विनंती करणारे पत्र मनपा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी राज्य शासनाकडे पाठवले आहे.

शहराचा जुना व विस्तारित असा एकत्रित विकास आराखडा तयार करण्यासाठी राज्य शासनाने नांदेड येथील ‘डीपी युनिट’ औरंगाबादेत पाठवले. युनिटप्रमुख तथा नगररचना उपसंचालक रजा खान यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या युनिटमध्ये सात कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जानेवारी २०२१ मध्ये डीपी युनिटला मनपामध्ये कार्यालयासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्यात आली. सर्व सुविधा देण्यात आल्या. डीपी युनिटने कामाला सुरुवात केल्यानंतर जीआयएस मॅपिंग आराखडा तयार करण्याचे निर्देश नगरविकास विभागाने दिले आहेत. त्यानुसार स्मार्ट सिटीने शहराचे जीआयएस मॅपिंगसाठी नियुक्त केलेल्या ॲमनेक्स कंपनीकडून जीआयएस मॅपिंग नकाशे उपलब्ध करून दिले. त्याबरोबरच नगररचना विभागाने मनपाचा जुना, प्रस्तावित नवीन, सिडको, छावणी, झालरक्षेत्र, एमआयडीसी या विभागाचे नकाशे उपलब्ध करून दिले. त्याआधारे व प्रत्यक्ष स्थळ पाहणी करीत डीपी युनिटने अस्तित्वात असलेल्या जागेचा वापर नकाशा (ईएलयू) तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आणले आहे.

बातम्या आणखी आहेत...