आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौथ्या दिवशी पाणी द्याच किंतू परंतू नको:चंद्र, मंगळावर ऑक्सीजन नेण्याची तयारी; मग शहराला सुरळीत पाणी पुरवठा का नाही-खंडपीठ

औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकीकडे चंद्र आणि मंगळ ग्रहावर ऑक्सीजन नेण्याची तयारी केली जात असताना दूसरीकडे औरंगाबाद महानगरपालिका शहरातील नागरिकांना प्रत्येक चौथ्या दिवशी पाणीपुरवठा करू शकत नाही. महापालिका प्रशासनाने पाणीपुरवठा वितरण प्रणालीत सुधारणा करून प्रत्येक चौथ्या दिवशी शहरातील नागरिकांना पाणी दिले पाहिजे. यात कुठलाही किंतू परंतु ऐकूण घेतला जाणार नाही असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. अरुण पेडणेकर यांनी दिले. अवैध नळजोडणी विरोधातील महापालिका प्रशासनाची मोहिम अधिक गतीमान करण्याचे निर्देश खंडपीठाने सुनावणीप्रसंगी दिले.

शहरातील नागरिकांना नियमित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी खंडपीठाने दाखल करून घेतलेल्या जनहित याचिका सुनावणीस आली. खंडपीठाने पाणीपुरवठा संबंधी सतत पाठपुरावा सुरू ठेवलेला आहे. शहरासाठी उभारण्यात येत असलेला 1680 कोटी रूपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या अंमलबजावणीसाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. शहरातील नागरिकांना केला जात असलेल्या पाणीपुरवठ्यात काही सुधारणा झाली काय अशी विचारणा खंडपीठाने सुनावणीप्रसंगी केली.

मनपा वकिलांनी पुरेशा प्रमाणावर पाणी उपलब्ध होत नाही. शहराची गरज जेवढी आहे तेवढे पाणी लिफ्ट होत नाही. विजेच्या माध्यमातून पाणी लिफ्ट केले जाते असे सांगितलेयावर खंडपीठ म्हणाले सारखी -सारखी उत्तरे देऊ नका. चंद्र आणि मंगळावर ऑक्सीजन नेण्याची तयारी झाली आहे. किंबहुणा नेण्यात आला. आपण शहराला चौथ्या दिवशी पाणी देऊ शकत नाही. यापुढे काही ऐकले जाणार नाही. प्रत्येक चोथ्या दिवशी पाणीपुरवठा झालाच पाहिजे. वितरण प्रणालीत सुधारणा करा. मनपा वकीलानी आतापर्यंत 955 अवैध नळजोडण्या तोडल्या आहेत. तीन महिन्यातील ही कारवाई आहे. 13 मे ते 1 सप्टेंबर 2022 या कालावधीत केलेली कारवाई आहे.

खंडपीठ म्हणाले की अवैध नळजोडण्या दीड लाखाच्या जवळपास असून केवळ आतापर्यंत 955 अवैध नळजोडण्याच कशा तोडल्या?

गणेशोत्सव आल्यामुळे तिकडे पोलिस संरक्षण वाढले. तरीही आमची कारवाई चालूच राहील असे असले तरी गणेशोत्सवानंतर पुन्हा मोहिम गतीमान केली जाईल. पाणीपुरवठासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर जबाबदारी असून त्यांनी लवकरात लवकर जलवाहिनी टाकण्याचे काम करावे असे मनपातर्फे स्पष्ट केले

खंडपीठाने आदेशात प्रत्येक चौथ्या दिवशी शहराला पाणीपुरवठा करण्यात यावा असे आदेश दिले. पुढील सुनावणी 12 सप्टेंबर रोजी ठेवली आहे. याचिकेत न्यायालयाचे मित्र म्हणून अ‌ॅड. सचिन देशमुख, राज्यशासनातर्फे सरकारी वकील ज्ञानेश्वर काळे, केंद्रातर्फे भूषण कुलकर्णी, एमजेपीतर्फे अ‌ॅड. विनोद पाटील, मनपातर्फे अ‌ॅड. संभाजी टोपे यांनी काम पाहिले.

बातम्या आणखी आहेत...