आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद कोरोना:शहरात आज 54 नव्या रुग्णांची वाढ, तर एकाचा मृत्यू; एकूण रुग्णसंख्या 562 वर, आतापर्यंत 52 रुग्ण घरी परतले

औरंगाबादएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • मराठवाडा : नांदेडमध्ये ७ नवे रुग्ण, वैजापूर तालुक्यात एक

औरंगाबादमध्ये कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या थांबण्याचे चित्र दिसत नाहीये. आज सकाळपासून शहरात कोरोनाचे 54 रुग्ण सापडले. यामुळे आता शहरातील एकूण रुग्णसंख्या 562 झाली आहे. विशेष म्हणजे राम नगर मध्ये काल पहिला रुग्ण पॉझिटिव्ह आला होता.कोरोनामुळे आज 13 वा बळी गेला. रोशन गेट परिसरातील 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. 

जिल्ह्यात शनिवारी 30 रुग्ण सापडले होते. सुखद बाब म्हणजे जिल्हा सामान्य रुग्णालयातून कोरोनामुक्त झालेल्या 35 जणांना सुटी देण्यात आली. आतापर्यंत 52 रुग्ण घरी परतले आहेत.

> संजयनगर-मुकुंदवाडीतील ६, कटकट गेट २, बाबर कॉलनी ४, आसेफिया कॉलनी १, सिल्कमिल कॉलनी १, रामनगर-मुकुंदवाडी १, भवानीनगर, जुना मोंढा २, सातारा परिसर १, पाणचक्की १, जुना बाजार १, पुंडलिकनगर ९, गंगापुरात एक रुग्ण सापडला.

मराठवाडा : नांदेडमध्ये ७ नवे रुग्ण, वैजापूर तालुक्यात एक

नांदेड जिल्ह्यात शनिवारी ७ पाॅझिटिव्ह रुग्ण आढळलेे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या ४४ झाली. यातील एक रुग्ण माहूरचा आहे. तसेच फुलशिवरा (ता. वैजापूर, जि. औरंगाबाद) येथे एक रुग्ण पॉझिटिव्ह आला. बीड, जालना, हिंगोली, परभणी, उस्मानाबादेत नवा रुग्ण आढळला नाही. उस्मानाबाद जिल्ह्यातील बाजारपेठेत प्रचंड गर्दी होत असल्याने आता रविवार वगळता दररोज सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत सर्व प्रकारची दुकाने सुरू ठेवली जाणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...