आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जी-20 परिषद:शहर विद्रूप करणाऱ्यांवर दंडासह फौजदारी गुन्हे दाखल करणार

छत्रपती संभाजीनगर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जी-२० परिषदेनिमित्त रंगरंगोटी, आकर्षक रोषणाई केल्यामुळे शहर सुंदर दिसत आहे. मात्र, काही समाजकंटकाकडून ते विद्रूप केले जात आहे. त्यामुळे आता नुकसान करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई तसेच वेळप्रसंगी फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती मनपा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली. शहराचे हे सुशोभीकरण कायम राहावे याकरिता मनपानेदेखील पुढाकार घेतला असून उड्डाणपुलावरील लायटिंग न काढण्याचा निर्णय घेतला आहे. रस्त्यांचे डांबरीकरण, दुभाजक, वाहतूक बेटांचे सुशोभीकरण, संरक्षक भिंतीवर चित्र काढणे, उड्डाणपुलांची रंगरंगोटी, लायटिंग, कृत्रिम विविधरंगी झाडे लावली. काही ठिकाणी नागरिक नासधूस करीत आहेत. अनेकांनी कुंड्या चोरून नेल्या. त्यांच्यावर आता सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवणार असल्याचे डॉ. चौधरी यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...