आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभय:मुख्यमंत्री म्हणतात, पुरेसे पाणी द्या; मनपाचे मात्र पाणीचोरांना अभय ; ठाकरेंच्या सभेपर्यंत अनधिकृत नळ तोडणी थांबवली

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ८ जून रोजी औरंगाबादेत जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे शहराच्या पाणीप्रश्नावर अचानक प्रशासन व सरकार सतर्क झाले. गुरुवारी स्वत: मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात बैठक घेऊन नवीन पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेतला. ‘या योजनेस तीन वर्षे लागतील, मात्र तोपर्यंत थांबू नका. सध्याच्या परिस्थितीतच उपाययोजना करुन औरंगाबादकरांना पुरेसे पाणी द्या,’ असे आदेश विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व मनपा प्रशासकांना दिले. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा खडबडून कामाला लागली. मात्र दुसरीकडे, याच सभेपूर्वी नागरिकांचा रोष नको म्हणून मनपाने शहरातील अवैध नळ कनेक्शन्स तोडण्याच्या मोहिमेला मात्र ब्रेक लावल्याची माहिती आहे. औरंगाबादेत दीड लाख अधिकृत नळ आहेत. त्यापेक्षा जास्त अनधिकृत माहिती मनपाकडेही आहे. झाेपडपट्टी ते उच्चभ्रू कॉलनींपर्यंत अशी सर्रास पाणी चोरी होते. पाणीटंचाईचे हेही प्रमुख कारण आहे. नगरसेवक, कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादानेच हे कनेक्शन देण्यात आल्यामुळे त्यावर कारवाई करण्याचे धाडस आतापर्यंत एकाही आयुक्तांनी दाखवले नाही. पण या वर्षी पाणीप्रश्नावर माेठ्या प्रमाणावर आक्रोश झाला. त्यामुळे मनपा प्रशासकांनी मुख्य लेखाधिकारी संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वात विशेष पथक स्थापन केली. या पथकाने पहाडसिंगपुरा, लक्ष्मी कॉलनी, शांतीपुरा, शहानूरमियाँ दर्गा, पडेगाव भागात पाहणी केली असता या पाचच वसाहतीत २००० अनधिकृत नळ दिसले. पहाडसिंगपुरात १२००, पडेगाव, शहानूरमियाँ भागात ६०० अनाधिकृत नळ आहेत. ते कापण्यासाठी दोनदा मुहूर्त ठरवण्यात आला, मात्र पोलिस बंदोबस्त न मिळाल्याचे कारण देत मोहिम सुरू झालीच नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, ही कारवाई झाली तर त्या भागातील लोकांचा रोष वाढू शकतो. मुख्यमंत्र्यांच्या सभेवरही त्याचे पडसाद उमटू शकतात. म्हणून मनपाला तूर्त ‘वेट अॅन्ड वॉच’चे वरुन आदेश आहेत.

1 मुख्यमंत्र्यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याची जबाबदारी विभागीय आयुक्तांवर टाकली. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी शुक्रवारपासून सुनील केंद्रेकर अॅक्शन मोडवर आले. नक्षत्रवाडी येथील एमबीआर येथे बैठक घेऊन त्यांनी काही सूचना केल्या. तसेच ‘सूचनेप्रमाणे काम झाले नाही तर अभियंत्यांवर गुन्हे दाखल करू,’ असा सज्जड दमही भरला. या वेळी एमजेपीचे अभियंता अभयसिंह, मनपाचे अभियंता किरण धांडे, पंडित, हेमंत कोल्हे, समीर जोशी उपस्थित होते.

2 एमआयडीसीतून दीड एमएलडी, हर्सूल तलावातून अतिरिक्त ५ एमएलडी पाणी मिळाल्यास शहराला सहाऐवजी चार दिवसांआड पाणीपुरवठा शक्य आहे. नहर-ए-अंबरीतूनही १ एलएमडी पाण्याचे नियोजन केले आहे. जुन्या जलवाहिनीच्या गळत्या, उपसा पंप, एमबीआरची साठवण क्षमता यात अनेक त्रुटी आयुक्तांच्या पाहणीत समोर आल्या. त्यांनी तातडीने या त्रुटी दूर करण्याच्या सूचना दिल्या.

3 हर्सूल तलावातून जादा पाण्यासाठी जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. एमबीआर येथे काही तांत्रिक बदल केले जातील. १५० एचपीचा पंप बसवणे, नवीन एमबीआरची उंची वाढवणे, हर्सूल तलावातील दोन्ही शुद्धीकरण केंद्रे चालू केल्यानंतर पाणी वितरण वाढेल. तलावातील जलउपसा वाहिन्यांत रांजण, हंडे व इतर गाळे अडकने १२ ऐवजी फक्त ३ एमएलडी पाणी जात होते. जलवाहिनी स्वच्छ केल्यामुळे ६ एमएलडी पाणी वाढले, असा दावा आयुक्तांनी केला.

बातम्या आणखी आहेत...