आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देखावा:मुख्यमंत्र्यांचा आदेश पाइपमध्ये घुसमटला ; आता बड्या कंपन्यांकडून तयार पाइप खरेदीची तयारी

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २ जून रोजी अत्यंत कडक शब्दांत आदेश दिले. त्यामुळे ६ जून रोजी नव्या पाणीपुरवठा योजनेतील पाइप टाकण्यास सुरुवात झाली, असा गाजावाजा करण्यात आला. प्रत्यक्षात तेथे फक्त खोदकाम झाले. सहा दिवसांत एक मीटरही पाइप पडलेला नाही. मात्र, पाइप निर्मितीची गती वाढली आहे. नक्षत्रवाडीच्या कारखान्यात तीन महिन्यांत ५५० मीटर तर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आठ दिवसांत २०० मीटर लांब पाइप तयार झाला आहे. दरम्यान, या कामाचा ठेका मिळवलेल्या जेव्हीपीआर कंपनीने बाहेरून पाइप खरेदीची तयारी सुरू केली आहे, अशी माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेच्या एक दिवस अगोदर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि ठेकेदार कंपनीने घाईघाईने १६८० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेत मुख्य जलवाहिनी टाकण्याच्या कामाचे भूमिपूजन केले. पुण्यातील जेजे कन्स्ट्रक्शन कंपनीतर्फे खोदकामाला सुरुवात झाली. दररोज किमान ५० मीटर पाइप टाकला जाईल, असे सांगण्यात आले. वस्तुस्थिती काय आहे, हे पाहण्यासाठी दिव्य मराठी प्रतिनिधीने ११ जून रोजी पैठण येथील यशवंतनगर भागाची पाहणी केली. तेव्हा तेथे जेमतेम पंधरा ते वीस मीटरचे खोदकाम झाले होते. हे कामसुद्धा अपूर्ण होते. एक बंद पोकलेन आणि तीन कर्मचारी कामाच्या ठिकाणी होते. सुपरवायझर महेश पवारही उपस्थित नव्हते. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. कामगारांनी सांगितले की, आमच्याकडे एकच मशीन आहे. डिझेल नसल्याने त्याचे काम थांबले आहे. यात आधी ब्रेकरने खडक फोडावा लागतो. नंतर त्यालाच बकेट लावून माती काढावी लागत आहे.

पैठण ते नक्षत्रवाडीदरम्यान मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू झाल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात दिव्य मराठीने शनिवारी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता एक मीटरही पाइप अंथरला नसल्याचे दिसून आले.

जीव्हीपीआर कंपनीचा सभेपूर्वी दिखावा जायकवाडी ते नक्षत्रवाडीदरम्यान ४० किलोमीटर लांब, २५०० मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी टाकली जाणार आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर, गतीने खोदकाम करणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात साइटवर एकच पोकलेन मशीन दिसून आले. ९ जूनपासून सर्वच काम बंद आहे, अशी माहिती मिळाली. मुख्यमंत्र्यांनी २ जून रोजी घेतलेली आढावा बैठक, त्यानंतर झालेली त्यांची सभा याचे निमित्त करून केवळ दिखावा करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जीव्हीपीआर कंपनीने पाइप टाकणे सुरू केल्याचा गवगवा केला, असे दिसले.

बाहेरून पाइप मागवणार एमजेपीचे कार्यकारी अभियंता अजयसिंग यांनी सांगितले की, आता बाहेरच्या कंपनीकडून २५०० मिमी व्यासाचा, याच दर्जाचा पाइप मागवण्यात येणार आहे. याबाबत अजून कंपनी निश्चित झालेली नाही. सध्या नक्षत्रवाडीच्या कारखान्यात ७५० मीटर पाइप तयार आहे. १८ महिन्यांपूर्वी कारखाना सुरू झाला. प्रत्यक्षात मार्च २०२२ पासून पाइप निर्मितीला सुरुवात झाली. चार महिन्यांत सुमारे ५५० मीटर पाइप तयार झाला. काही दिवसांत कामाला गती Ãपाइप टाकण्याचे काम नियोजनपूर्ण सुरू आहे. या आठवड्यात तीन मशीन येऊन काम सुरू होईल. २०० मीटर पाइप टाकण्याचे काम झाल्यानंतर नेमक्या काय अडचणी येत आहेत, हे लक्षात येईल. हायवे असल्यामुळे वाहतुकीला अडथळा येणार नाही याचीही काळजी घ्यावी लागेल. पथदिव्यांचे खांब, झाडे काढावे लागतील. सुरुवातीला हळू वाटणारे काम काही दिवसांत गती घेईल. – अजयसिंग, कार्यकारी अभियंता, एमजेपी

बातम्या आणखी आहेत...