आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रश्न- उत्तरे:बाजारातील जोखीम कमी करते क्वालिटी लार्ज-स्मॉलचे संयोजन, शेअर्समध्ये गेल्या वर्षभरात लक्षणीय घट

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माझ्या पोर्टफोलिओमध्ये माझ्याकडे सिएटचे १५० शेअर्स आहेत. सध्या यात मला प्रति शेअर ६५ रुपये नफा आहे. मी ते ठेवावे की विकून नफा कमवावा? - मीनल कोटनाला

ऑटोमोबाइल क्षेत्रातील मंदावलेल्या वाढीमुळे सिएटच्या शेअर्समध्ये गेल्या वर्षभरात लक्षणीय घट झाली आहे. नजीकच्या काळात मार्जिनचा दबाव कायम राहण्याची अपेक्षा असतानाही आम्ही आेईएम (मूळ उपकरणे उत्पादक) आणि रिप्लेसमेंट या दाेन्ही बाजारांत सुधारणा हाेण्याची अपेक्षा आहे. नजीकच्या भविष्यात सीएटला याचा फायदा होणार आहे. म्हणून तुम्ही सिएटचेे शेअर्स ठेवा असे आम्ही सुचवताे.

मला काही स्मॉल कॅप समभागांमध्ये १-२ वर्षांसाठी ५०,०० रुपये गुंतवायचे आहेत. कृपया मला असे शेअर्स सुचवा जे २०-३०% परतावा देऊ शकतील.- अमीर हुसेन

चांगल्या दर्जाच्या लार्ज कॅप्स आणि स्मॉल कॅप्सच्या संयोजनामुळे अस्थिर बाजारातील जोखीम कमी होते. असा आज बाजाराचा कल आहे.

स्मॉल कॅप्समध्ये, आम्ही ओरिएंट इलेक्ट्रिक, ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन आणि झेन्सार टेक्नॉलॉजीजवर सकारात्मक आहोत. लार्ज कॅप्समध्ये तुम्ही भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक आणि इन्फोसिसचा विचार करू शकता.

माझ्याकडे अॅक्सिस बँकेचे ८१४ रुपये किमतीचे २०० शेअर्स आहेत. याशिवाय मदरसन सुमीचे १९५ रुपये कंमतीचे २५० शेअर्सही रुपयांना आहेत. सध्या या दोन्ही समभागांमध्ये माझे मोठे नुकसान होत आहे. मी काय करावे ते सुचवा.- उज्ज्वल साहनी

आम्ही अॅक्सिस बँक आणि मदरसन सुमी या दोघांबाबत सकारात्मक आहोत. अॅक्सिस बँक कर्ज वितरणातील मजबूत वाढीबरोबरच उच्च मार्जिन आणि नियंत्रित तरतुदींद्वारे आपला किरकोळ व्यवसाय मजबूत करत आहे. याशिवाय त्यांनी सिटी बँक इंडियाचा ग्राहक बँकिंग व्यवसायही ताब्यात घेतला आहे. त्यामुळे क्रेडिट कार्ड विभागातील त्याचा बाजारातील हिस्सा वाढला आहे. उद्योगाची सुधारणा, ग्रीनफील्ड प्रकल्पांमधील संक्रमण आणि कंपनीच्या मजबूत ऑर्डर बुकमुळे मदरसन सुमीबद्दलची आमची सकारात्मक भावना आहे.

बँकिंग निर्देशांकाने गेल्या आर्थिक वर्षात नकारात्मक परतावा दिला आहे. चालू आर्थिक वर्षात बँकिंग समभागांची कामगिरी कशी अपेक्षित आहे? बँकिंग समभाग खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? - जयंती शर्मा

विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (एफआयआय) मोठ्या प्रमाणात विक्री केल्यामुळे आणि जगभरात व्याजदर वाढण्याची भीती यामुळे बँकिंग आणि वित्तीय क्षेत्राची कामगिरी कमी झाली आहे. तथापि, क्रेडिट वितरण मजबूत झाल्यामुळे आणि मालमत्तेच्या गुणवत्तेत सुधारणा झाल्यामुळे बँकिंग क्षेत्राची कमाई वाढत आहे. आर्थिक घडामोडी जशाजशा वाढतील तसतसे या क्षेत्राच्या वाढीचा वेग वाढेल अशी आमची अपेक्षा आहे. आर्थिक वर्ष २२-२३ मध्ये भांडवली खर्चाचे चक्रदेखील सुधारेल. बँकिंग क्षेत्रात आम्ही आयसीआयसीआय आणि स्टेट बँकेबद्दल सकारात्मक आहोत.

माझ्याकडे एलआयसी हाउसिंग फायनान्सचे २०० शेअर्स आहेत. मी ते ३४२ किमतीला विकत घेतले. मला त्यांना किमान एक वर्ष ठेवायचे आहे. ही योग्य रणनीती आहे का? - कल्याण मंगल

हाउसिंग फायनान्स क्षेत्राने गेल्या १-२ वर्षांपासून फारशी चांगली कामगिरी केलेली नसताना, एलआयसी हाउसिंग फायनान्सने खराब परिणामांमुळे संपूर्ण आर्थिक क्षेत्राची कामगिरी कमी केली आहे. आम्ही सुचवितो की तुम्ही एकतर गृहनिर्माण वित्त क्षेत्रातील एचडीएफसी लिमिटेडकडे जा किंवा एनबीएफसीमध्ये बजाज फायनान्सचे शेअर्स खरेदी करा. आम्हाला वाटते की हे दोन्ही पर्याय एलआयसी हाउसिंग फायनान्सपेक्षा चांगले सिद्ध होतील.

बातम्या आणखी आहेत...