आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदाधिकाऱ्यांची बैठक:मराठा कुणबी असल्याचे पुरावे आयोगाला देणार ; मराठा समाजाची बाजू मांडणार

औरंगाबाद19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्यातील मराठा समाज कुणबी असल्याचे पुरावे १२ सप्टेंबर रोजी पुणे येथे राज्य मागासवर्ग आयोगासमोर सादर करण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाने एकमताने मंजूर केला. आयोगासमोर ठोस पुरावे सादर करण्यासाठी मराठा संघटना व मराठा क्रांती मोर्चाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात असे सांगण्यात आले की, मराठवाडा हा आधी आंध्र प्रदेशचा भाग होता. त्या वेळेस मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश होता. आजही आंध्र प्रदेशमध्ये मराठा समाज ओबीसीत आहे. त्या काळातील एससी, एसटी, ओबीसींचा मात्र त्या प्रवर्गात समावेश केला आहे. आम्ही ओबीसी समावेशाची मागणी करत नसून आमच्या हक्काचे आरक्षण द्या, अशी आमची भूमिका आहे. आज मराठवाडा आंध्र प्रदेशमध्ये असता तर आम्हाला ओबीसी समाजामध्ये आरक्षण मिळालेे असते. मराठा समाजबांधवांकडे काही माहिती असल्यास ती द्यावी, असे आवाहन किशोर चव्हाण यांनी केले. बैठकीला राजेंद्र दाते पाटील, विनोद पाटील, अभिजित देशमुख, सुरेश वाकडे, शिवप्रहारचे सरचिटणीस प्रशांत इंगळे, रेखा वहाटुळे, सुवर्णा मोहिते आदी उपस्थित होते.

राजकीय द्वेषापोटी अन्याय मराठवाड्यातील मराठा समाजाच्या नोंदी स्वातंत्र्यापूर्वी “कुणबी” म्हणूनच होत्या. नंतरच्या काळात राजकीय द्वेषापोटी त्या बदलल्या गेल्या. त्यामुळेच मराठवाड्यातील मराठ्यांचा हक्क १९६० पासून इथल्या व्यवस्थेने नाकारला आहे.”Gazetteer of the Nizam’s Dominions’ या राज्य शासनातर्फे प्रकाशित ग्रंथात तत्कालीन गावनिहाय व जातनिहाय जनगणनेत मराठा जातीऐवजी “कुणबी” असेच उल्लेख गावोगावी आहेत, अशी मांडणी धनंजय पाटील यांनी पुराव्यासह केली.

बातम्या आणखी आहेत...