आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामी मतदार संघातील अडचणी सोडवण्यासाठी आलो होतो. गण - गटांच्या हरकतींवर सुनावणी सुरू आहे. त्यात मी कोणताही हस्तक्षेप करणार नाही, असे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या भेटीसाठी गुरुवारी आलेल्या केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले. मात्र, ऐन गण-गटाच्या हरकतीवेळी त्यांनी एंट्री मारल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली.
दानवे का आले?
जिल्हा परिषद - पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीसाठी प्रशासनाने तयार केलेल्या गण-गटांचा प्रारूप आराखड्यावर एकूण १५८ हरकती आक्षेप आले होते. यातील सर्वाधिक आक्षेप हरकती औरंगाबाद तालुक्यातील आहेत. यापैकी पिसादेवी गटाचा आणि करमाडचा मुद्दा सोबत आलेले कार्यकर्ते प्रामुख्याने मांडत होते. दानवे यासाठीच विभागीय आयुक्तालयात आल्याचे चर्चा होती.
थेट उद्देश सांगितला
रावसाहेब दानवे यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. विधान परिषदेच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की, आघाडीला रोखणे हे आमचे उद्दीष्ट आहे. खडसे किंवा इतर कोणाला मागे ओढणे आमचा उद्देश नाही. आमचा थेट उद्देश काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना रोखणे असा आहे.
दोघांचे भांडण अन्...
खासदार इम्तियाज यांनी पंकजा मुंडे स्वतंत्र पक्ष स्थापना केली, तर आम्ही पाठिंबा देऊ असे म्हटल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला उधाण आले आहे. यावर दानवे म्हणाले की, दोघांचे भांडण असेल तर तिसऱ्याला बोलण्यात मजा वाटते, पण आम्ही आमचे सर्व काही सांभाळून घेऊ असेही ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.