आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घोटाळा:आपल्या नावे निविदा भरल्याचे गुन्हा दाखल झाल्यावरच कंपनीस कळले

छत्रपती संभाजीनगर / मंदार जोशीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

घरकुल योजनेच्या निविदा प्रक्रियेतील गैरप्रकार प्रकरणात मनपा आणि पोलिसांच्या तपासात आश्चर्यकारक बाबी समोर येत आहेत. या प्रकरणातील यातील एका कंत्राटदार कंपनीला आपल्या नावे निविदा भरली होती याचीच माहिती नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या आठवड्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आपल्या नावावर निविदा भरल्याचे त्यांना कळाले. या कंत्राटदाराने दोन दिवसांपूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन ही माहिती दिल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.

महापालिकेने पंतप्रधान आवास (घरकुल) योजनेंतर्गत सुमारे ३९ हजार घरांचा ‘डीपीआर’ तयार करून निविदा प्रक्रिया पूर्ण केली. मात्र, या प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर आला आहे. उच्चस्तरीय हालचाली झाल्यानंतर २३ फेब्रुवारी रोजी सिटी चौक पोलिस ठाण्यात तीन कंपन्यांच्या संचालकांसह तब्बल १९ भागीदारांवर गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखेकडे या तपासाची जवाबदारी दिली. मनपा उपायुक्त अपर्णा थेटे यांच्या तक्रारीवरून समरथ कन्स्ट्रक्शन, इंडोग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर, जग्वार ग्लोबल सर्व्हिसेस या तीन कंत्राटदार कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल केला.

बळ देणाऱ्यांनी घेतली माघार सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घरकुल योजनेच्या निविदा प्रक्रियेतील घोटाळ्यावरून भाजपमधील दोन गटांत शीतयुद्ध सुरू झाले आहे. एक गट कंत्राटदाराच्या बाजूने, तर एक गट विरोधात आहे. हा वाद थेट मुंबईपर्यंत पोहोचला. त्यानंतर दोन्ही गटांची कानउघाडणी करण्यात आल्याची चर्चा आहे. यानंतर ज्यांनी गुन्हे दाखल करण्याचे बळ दिले, तेच आता मागे सरकत असल्याचीदेखील चर्चा आहे.

फक्त आयपी अॅड्रेसच एक नाही, कंपन्याही बोगस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकाच आयपी अॅड्रेसवरून तीन वेगवेगळ्या कंपन्यांच्या निविदा भरल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, आता यात सहभागी झालेल्या कंपन्यांची कागदपत्रेदेखील बनावट असल्याचे समोर येत आहे. फक्त मोठ्या कंपन्यांचे नाव वापरले आहे. प्रत्यक्षात या कंपन्यांना आपल्या नावाचा वापर केल्याची माहिती नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे ४,६०० कोटी रुपयांचे टेंडर देतानादेखील ही काळजी घेण्यात आली नाही. या निविदेच्या कागदपत्रांवरील मोबाइल बंद आहेत. लँडलाइन नंबर समोर ‘०२४०’ आणि त्यानंतर ‘०००००’ असे लिहिले आहे. इंटरनेटवर याच नावाच्या कंपन्या अांतराष्ट्रीय दर्जाच्या असल्याचेदेखील दिसत आहे.

बातम्या आणखी आहेत...