आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेटवलेल्या तरुणीची प्रकृती चिंताजनक:घाटीत उपचार सुरू; पैसे खर्च करूनही 'ती बोलत नाही' या व्यथेतून गजाननचे टोकाचे पाऊल

औरंगाबाद6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

'आधी मंदिरात माझ्याशी लग्न केले, मी तुझ्यावर अडीच लाख रुपये खर्च केले. पण आता ती आपल्याशी बोलत नाही, शिवाय तिला बोलण्याचा, भेटण्याचा प्रयत्न केला तर ती पोलिसांत तक्रार देत आहे,'' अशा नैराश्यातून सोमवारी पीएचडी करणाऱ्या गजानन मुंडे या तरुणाने स्वत:ला पेटवून तरुणीलाही पेटवले होते. यानंतर गंभीर भाजल्याने तरुणाचा सोमवारी रात्रीच मृत्यू झाला, तर 40 टक्के भाजलेल्या तरुणीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणात गुन्हाही नोंद झाला आहे.

तरुणीवर घाटीत उपचार सुरू

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरातील शासकीय विद्यालयामध्ये पीएचडी शिक्षण घेणाऱ्या गजानन मुंडे या तरुणाने स्वतःला जाळून घेत आपल्या प्रेयसीला कवेत घेतले होते. यात गजानन मुंडे 95% जळाला होता. उपचारादरम्यान रात्री 9.45 वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

ती 40 टक्के जळाली

गजानन मुंडे याने पेटवून घेतल्यानंतर मुलगी पूजा साळवे हिलाही आपल्या कवेत घेतले. यामुळे ती 40 टक्के भाजली. यामुळे ती सध्या ऑक्सिजन सपोर्टवर असून तिच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील डाॅक्टरांनी सांगितले आहे.

दुचाकीसह गजानन.
दुचाकीसह गजानन.

तरुणावर गुन्हा

या जळीतकांडानंतर पूजाच्या भाऊजींनी दिलेल्या फर्यादीनुसार मृत गजानन खुशालराव मुंडे (वय 30 वर्ष रा. दाभा, ता. जिंतूर. जि. परभणी) याच्यावर बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोघे करत होते पीएचडी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात शासकीय विद्यालयामध्ये पीएचडी शिक्षण घेणाऱ्या गजानन मुंडे व पूजा दोघेही पीएचडी करत होते. गजानन मुंडे आणि पूजा साळवे हे दोघे शासकीय न्याय सहाय्यक विज्ञान संस्था या कॉलेजमध्ये होते. मागील काही महिन्यांपासून दोघांमध्ये वाद झाल्याने दोघांत अबोला होता.

तरुणीने दिली होती पोलिस तक्रार

गजानन पूजाशी बोलण्याचा वारंवार प्रयत्न करत होता. त्यातूनच पूजाने एकदा ती राहत असलेल्या सिडको पोलिस ठाण्यात, तर एकदा तिची ताई राहत असलेल्या परिसरातील बेगमपुरा पोलिस ठाण्यात गजाननविरुद्ध लेखी तक्रार दिली होती. त्यावरून पोलिसांनी त्याला नोटीस बजावत ताकीदसुद्धा दिली होती.

गजाननचे वास्तव्य असलेली हीच ती खोली.
गजाननचे वास्तव्य असलेली हीच ती खोली.

तो होता तणावात

पूजाने पोलिसांत तक्रार दिल्याने गजानन कायम तणावात राहू लागला. त्यातूनच त्याने सोमवारी अतिशय टोकाचे पाऊल उचलत स्वतःसह पूजाचे जीवन संपवण्यासाठी अंगावर पेट्रोल टाकून लायटरने पेटवून घेतले. या घटनेनंतर औरंगाबाद शहर पुन्हा एकदा हादरून गेले.

उत्तरीय तपासणी झाली

या घटनेत मृत्यू झालेल्या गजाननची उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अंत्यविधीसाठी मृतदेह त्याच्या मूळ गावी जिंतूर तालुक्यातील दाभा दिग्रस येथे रवाना करण्यात आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी दिली.

गजानन मुंडे याने काही महिन्यापूर्वी घेतलेली दुचाकी.
गजानन मुंडे याने काही महिन्यापूर्वी घेतलेली दुचाकी.

40 टक्के भाजलेल्या अवस्थेतील पूजाचा पोलिसांनी जबाब घेतला. तिने सांगितले, ‘माझी इच्छा नसताना गजानन पाठलाग करायचा. माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. मी वारंवार त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने एकले नाही. त्यामुळे मी पोलिस ठाण्यात गेले.’ दरम्यान, पूजाच्या नातेवाइकांनी रात्री उशिरा बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

बातम्या आणखी आहेत...