आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
देशभरात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव यामुळे यंदा परीक्षा न घेताच शाळा बंद करण्यात आल्या तर, शाळेतील उर्वरित पोषण आहाराचे धान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात यावे असे आदेश देण्यात आले होते. परंतु ते धान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेच नाही. हे नसे थोडके की काय? मार्च महिन्यापासूनच शाळा बंद आहेत. त्यामुळे या शैक्षणिक सत्रातील धान्य पॅकिंगच्या स्वरुपात देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यातही दुटप्पीपणा करण्यात आला असून, या योजनेअंतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना तांदूळ, हरभरा व मुगडाळ वाटप करण्यात येतात. ग्रामीण भागातील शाळांना जून ते नोव्हेंबर या महिन्यातील पोषण आहारात तांदूळ, चवळी, मूगदाळ असा कोरडा आहाराचे वाटप सुरु आहे. परंतू, शहरातील विद्यार्थ्यांना या महिन्याचा फक्त तांदूळच देण्यात येत आहे. शहरातील विद्यार्थ्यांसाठी एक आणि ग्रामीणसाठी एक अशी दुहेरी भूमिका का असा प्रश्न शिक्षकांकडून केला जात आहे.
देशभरात कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी सरकारने मध्यान्ह भोजन योजनेतील शालेय पोषण आहारही सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यात खिचडी शिजवून न देता विद्यार्थ्यांना शिधा स्वरूपात धान्य वाटप करण्यात येत आहे. त्यानुसार ग्रामीण भागात पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांकरिता जून ते ऑगस्ट या ६० दिवसासाठी सहा किलो तांदूळ, दिड किलो मूंगदाळ, १.३८० किलो चवळी; तर इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्याकरिता नऊ किलो तांदूळ, २.३५० किलोग्रॅम मूंगदाळ, २.७० किलोग्रॅम चवळी तसेच सप्टेंबर ते नोव्हेंबर या ५६ दिवसाच्या कालावधीतील इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांकरिता ५.६ किलो तांदूळ, दिड किलो मूंगदाळ व १.१५० किलोग्रॅम चवळी; तर इयत्ता सहावी ते आठवीसाठी ८.४ किलो तांदूळ, २.२५० किलोग्रॅम मूंगदाळ, १.७२५ किलोग्रॅम चवळी या प्रमाणात पोषण आहार दिला जात आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत जिल्ह्यातील ३ हजार ५३ शाळांना एप्रिल ते मे या ३४ दिवसांचे तांदूळ, मूंगदाळ, चवळी असे धान्य वाटप करण्यात आले होते. मात्र, आता जिल्ह्यातील शाळांना तांदूळासह कडधान्य देण्यात येत आहे. मात्र, शहरी भागातील शाळेतील विद्यार्थ्यांना केवळ तांदूळच वितरीत करण्यात येत आहे. शहरातील शाळांसाठी शासनाची दुपटी भूमिका का? असा सवाल शाळांकडून उपस्थित करण्यात येत आहे. पालकांकडूनही याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत असून शाळेकडे याविषयी विचारणा केली जात आहे.
जेव्हा सूचना येईल तेव्हा कडधान्य -
आपल्याकडे सेंट्रल नावाची किचन सिस्टम आहे. या अंतर्गत शहरातील जवळपास ३५० शाळा आहेत. मनपा आणि इतर काही शाळा सेंट्रल किचनमध्ये नाहीत. ज्या शाळा सेंट्रल किचनमध्ये आहेत. त्यांना फक्त तांदूळच द्यावा, असे शासनाचे आदेश आहेत. त्या शाळांना कडधान्य देण्यासाठी शासनाकडून स्वतंत्र कंत्राटदार नेमण्यात येणार आहे. जेंव्हा शासनाच्या सूचना येतील तेंव्हा विद्यार्थ्यांना कडधान्य वितरीत करण्यात येईल. - भाऊसाहेब देशपांडे शालेय पोषण आहार अधिक्षक
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.