आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेश:विद्यापीठातील नवीन गेटचे बांधकाम अखेर पाडले ; मोठा विरोध झाल्यामुळे प्रशासनाने उचलले पाऊल

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही दिवसांपासून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या सुशोभिकरणासोबत नवे इन-आउट गेट उभारण्यात येत होते. त्याला प्रतिगेट असे म्हणत आंबेडकरी चळवळीतून झालेला विरोध आणि वादविवादानंतर या नवीन गेटचे बांधकाम रविवारी पाडण्यात आले.

विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासंदर्भात अनेक आठवणी आणि ऐतिहासिक संदर्भ आहेत. या प्रवेशद्वाराशी आंबेडकरी जनतेच्या भावना जोडलेल्या आहेत. त्याचे संवर्धन आणि सुशोभिकरणाचे काम विद्यापीठ प्रशासाने हाती घेतले होते. गेटच्या संवर्धन आणि सुशोभीकरणाचे काम वेगाने सुरू होते. सुरक्षा भिंती, बाजूच्या दोन्ही रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून, सुरक्षा गेट आणि सुशोभीकरणाचे काम विद्यापीठ नामविस्तार दिनापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. या प्रकल्पासाठी २ कोटी रुपयांचा खर्च नियोजित आहे.

३ टॉवर उभारले होते विद्यापीठात येणाऱ्या-जाणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी इन-आउट गेटची उभारणी सुरू होती. त्या गेटच्या दोन्ही बाजूने पाण्याचे कारंजे प्रस्तावित आहेत. इन-आऊट गेटच्या ३ टाॅवरची उभारणी पूर्ण होत आलेली असताना हे प्रतिगेट होत असल्याचे म्हणत आंबेडकरी संघटनांकडून त्याला विरोध दर्शवण्यात आला. विरोध वाढल्याने कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी हे बांधकाम काढून घेण्याचा निर्णय घेतला. कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांनी जागतिक बँक प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र लिहून या गेटचे बांधकाम तातडीने पाडण्याचे पत्र दिले.

बातम्या आणखी आहेत...