आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामस्थांनी शाळेला ठाेकले कुलूप:शिक्षकांची सतत दांडी; घारेगाव जिल्हा परिषद शाळेला ठाेकले कुलूप

पाचोड10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

घारेगाव (ता. औरंगाबाद) येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकांसह शिक्षक सतत दांडी मारत असल्यामुळे गावकऱ्यांनी गुरुवारी (ता.२२) सकाळी शाळेत जाऊन पाहणी केली. या वेळी तिथे सातपैकी तीन शिक्षक शाळेत गैरहजर असल्याचे दिसून आले. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठाेकले. दरम्यान, जोपर्यंत गैरहजर शिक्षक सतत शाळेत येत नाहीत तोपर्यंत विद्यार्थ्यांना आम्ही शाळेत पाठवणार नाही, अशी भूमिका पालकांनी घेतली.

बातम्या आणखी आहेत...