आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिरूप महासभा:नगरसेवकांनी पाच तास डागल्या पाणी, रस्ते, अतिक्रमण, कचरा प्रश्नांच्या फैरी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्थळ : मौलाना आझाद रिसर्च सेंटर वेळ : सकाळी 10.30

सलीम अली सरोवराजवळील मौलाना आझाद रिसर्च सेंटरचा परिसर शुक्रवारी सकाळी गजबजून गेला होता. येथे एक वेगळेच वातावरण होते. ते नेहमीप्रमाणे सभा-समारंभासारखे नव्हते. तर शहराच्या प्रश्नाविषयी काहीतरी घडणार असे सांगणारे होते. सभागृहात आसनांची मांडणी होत होती. मंचावर बॅनर लावले जात होते. मंचावर विषयपत्रिकेच्या प्रती ठेवल्या जात होत्या. काही वेळातच विशेष अंगरखा परिधान केलेले मावळते महापौर नंदकुमार घोडेले यांचे आगमन झाले. त्यांच्यासोबतच मनपा प्रशासक डॉ. अभिजित चौधरीही दाखल झाले आणि मंचावर विराजमान झाले. महापौरांच्या उजवीकडे उपमहापौर राजेंद्र जंजाळ, सचवि अपर्णा थेटे, अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाणे, डावीकडे प्रशासक डॉ. चौधरी होते. सभागृहात उजवीकडे अधिकारी कक्ष तर डावीकडे विशेष निमंत्रितांची आसन व्यवस्था होती. एरवी मनपाच्या प्रबोधनकार ठाकरे सभागृहात होणाऱ्या सर्वसाधारण सभेसारखे चित्र शुक्रवारी मौलाना आझाद रिसर्च सेंटरमध्ये हुबेहूब, काकणभर सरस पाहण्यास मिळाले. निमित्त होते, दवि्य मराठीने आयोजित केलेल्या अभिरूप महासभेचे.

गेली अडीच वर्षे महापालिकेची कार्यकारिणीच अस्तित्वात नसल्याने सर्वसाधारण सभाच झाली नाही. १७ लाख औरंगाबादकरांना भेडसावणारे शेकडो प्रश्न प्रशासनापुढे कसे मांडावे, या प्रश्नाने त्रस्त ११५ पैकी ९२ नगरसेवकांनी पाच तास पाणीपुरवठा, ड्रेनेज, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, सौंदर्यीकरण, स्मार्ट सिटी, मोकाट कुत्र्यांचा उच्छाद, अतिक्रमण, स्मार्ट सिटी विकासकामे, रेन वॉटर हार्वेस्टिंग आदी प्रश्नांच्या फैरी झाडल्या. विषयपत्रिकेतील १६ अशासकीय प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आले. या विषयांकडे गांभीर्याने पाहत नागरी समस्या सोडवण्याची ग्वाही मनपा प्रशासक डाॅ. अभिजित चौधरी यांनी दिली. वंदे मातरमने सभेच्या कामकाजाला सुरुवात झाली.

दिवंगत नगरसेवक रावसाहेब आमले, नितीन साळवी तसेच लता मंगेशकर, विक्रम गोखले, विनायक मेटे आणि कोरोनाकाळात गमावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर चर्चेला प्रारंभ झाला. कुणी पहिले बोलावे, या मुद्द्यावरून गदारोळ झाला. त्यामुळे सभा पाच मिनिटांसाठी तहकूब करण्यात आली. महापौरांनी एक महिला एक पुरुष असा क्रम ठरवून एकेकाच्या नावाचा पुकारा केला. पाच तास चाललेल्या सभेची राष्ट्रगीताने सांगता झाली. या सभेसाठी महानगरपालिकेचे अधिकारी आणि शहरातील ववििध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.या सभेसाठी अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाणे, शहर अभियंता सखाराम पानझडे, सचवि अपर्णा थेटे, उपायुक्त सोमनाथ जाधव, पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख एम. बी. काझी, वरिष्ठ अभियंता संजय कोंबडे, एस. आर. संधा, शिक्षण अधिकारी संजीव सोनार आणि जनसंपर्क अधिकारी तौसिफ अहमद आदी उपस्थित होते. सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयाच्या डॉ. गजानन सानप यांच्या प्रयत्नामुळे एनसीसी कॅडेट्सनी या कार्यक्रमात स्वयंस्फूर्तीने सहभाग घेत आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले, तर संदीप डेकोरेटर्सने आयोजनासाठी भरीव मदत केली.

अडीच वर्षांचा बॅकलॉग भरून निघेल : घोडेले

अडीच वर्षांनंतर दिव्य मराठीने आयोजित केलेल्या अभिरूप महासभेमुळे सर्व नगरसेवक आणि मनपा अधिकारी एकत्र आले. पाच तास चाललेल्या या चर्चेमुळे शहरातील अनेक प्रश्न मार्गी लागतील, अशी अपेक्षा आहे. अधिकारी भेटत नाहीत ही नगरसेवकांची तक्रार या सभेमुळे दूर झाली. सर्व नगरसेवकांनी पोटतिडकीने आपल्या वॉर्डातील समस्या मांडल्या. विशेष म्हणजे आयुक्तांसह सर्व अधिकाऱ्यांनी त्या नोंदवून घेतल्या. अडीच वर्षांचा बॅकलॉग भरून निघेल, अशी अपेक्षा आहे.

आचारसंहितेपूर्वी तातडीने कामे मार्गी लावा : आमदार जैस्वाल

​​​​​​​एक काळ असा होता की शहरात १५०० परदेशी पर्यटक येत होते. आता एकही दिसत नाही. हे का झाले, याचा विचार करावा. मुख्य रस्ते खराब झाले आहेत. अनेक कामे प्रलंबित आहेत. त्यासाठी शासनाने निधी मंजूर केला आहे. पण आगामी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद नविडणुकीची आचारसंहिता लक्षात घेऊन महत्त्वाची कामे नाहरकत प्रमाणपत्र देऊन तातडीने मार्गी लावावीत.

सभेमुळे अनेक प्रश्न समोर आले : आयुक्त डाॅ. चाैधरी

​​​​​​​या अभिरूप महासभेमुळे शहरातील अनेक प्रश्न, समस्या नगरसेवकांमार्फत माझ्या तसेच अधिकाऱ्यांसमोर आल्या. प्रामुख्याने कचरा ट्रांझिट सेंटरचे कचरा डेपोत रूपांतर होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. इतर समस्यांसाठी प्रत्यक्ष पाहणी करून पुढील कारवाई केली जाईल. या निमित्ताने प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये संवाद झाला, प्रश्न साेडवण्यासाठी ताे फायदेशीर ठरेल.

भ्रष्टाचाराचा अड्डा होत आहे मनपा कार्यालय : जंजाळ

​​​​​​​महापालिका भ्रष्टाचाराचा अड्डा होत चालला आहे. तीन वर्षांपासून सदस्य नसल्याने अधिकाऱ्यांना कुणाचाही धाक नाही. मृत्यू प्रमाणपत्र काढण्यासाठीही पैसे द्यावे लागतात. नागरी मित्र पथक नागरी शत्रू पथक झाले आहे. डीपी प्लॅनमध्ये मनमानी कारभार सुरू आहे. हवे तसे आरक्षण बदलण्याचा घाट घातला जात आहे. अधिकारी मनपात कमी, स्मार्ट सिटी कार्यालयात जास्त असतात.

निधी कमी पडू देणार नाही : शिरीष बाेराळकर

​​​​​​​हे गतिमान सरकार आहे. शिंदे -फडणवीस यांचे या शहराकडे विशेष लक्ष आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यापूर्वी शहरासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. यापुढील काळातही ते निधी कमी पडूू देणार नाही. आणि इतर कामांसाठी आमदार प्रदीप जैस्वाल तसेच इतर मान्यवर मंत्रीही खंबीरपणे पाठपुरावा करतील, याची मला खात्री आहे.

ठोस निर्णय व्हावेत : किशनचंद तनवाणी

​​​​​​​अडीच वर्षे कोरोनामुळे शहराचा विकास ठप्प झाला हाेता. त्यामुळे अनेक कामे मागे पडली आहेत. लोक अजूनही मूलभूत नागरी प्रश्नांसाठी झुंजत आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी मनपा प्रशासनाने धोरणात्मक प्रश्नांवर ठोस निर्णय घेतले पाहिजेत. विशेषत: पाणी, रस्ते, कचरा हे विषय अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्याकडे प्रशासनाकडे लक्ष द्यावे.

पाणी समस्या : १९३ कोटींची जुनी पाणी योजना कधी पूर्ण होणार, पाइप कोणत्या कंपनीचे येतील

नवी पाणीपुरवठा योजना पूर्ण होण्यास तीन वर्षे लागतील. त्यापूर्वी १९३ कोटींची जुनी योेजना पूर्ण व्हायला हवी, त्याचे स्टेटस काय आहे. योजनेसाठी पाइप कोणत्या कंपनीचे आणले जाणार आहेत. नगरसेवकांनी नागरिकांचा रोष पत्करून कचऱ्यासाठी जागा दिली होती, प्रशासनाने त्याचे डंपिंग ग्राउंड होऊ देऊ नये. घंटागाडीच्या माध्यमातून कचरा गोळा केला जात नाही. त्याकडे लक्ष द्यावे.

आरोग्याचा प्रश्न : मेल्ट्रॉन हॉस्पिटल ताकदीने चालवा, सिडको नाट्यगृहाचे काम लवकर करा

शिवाजीनगरकडे जाणारा १८ कोटींचा १५०० मीटरचा रस्ता घरांच्या अतिक्रमणामुळे अर्धवट राहिला आहे, तो पूर्ण करावा. मेल्ट्रॉन हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्यांची भरती करावी. मुकुंदवाडी भागात ८०० विद्यार्थी आहेत त्या शाळेचे काम करा. तेथील स्मशानभूमीच्या दुरवस्थेकडे लक्ष द्या. सिडको नाट्यगृहाची दुरवस्था झाली असून त्याचे काम मनपाने लवकरात लवकर करावे.

पार्किंगची समस्या : पॉलिसी अद्याप स्पष्ट नाही, आवाज उठवल्यामुळे माझ्यावरच हल्ले झाले

शहरात पार्किंगची समस्या गंभीर होत चालली आहे. रस्त्याच्या बाजूला सर्रास वाहने उभी केली जातात, त्यामुळे पादचाऱ्यांना त्रास होतो. याबद्दल मी आवाज उठवला असता काही दविसांपूर्वी माझ्यावर हल्ला झाला होता. ही बाब मी वेळोवेळी मनपा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. मात्र त्याकडे कुणीही लक्ष दिले नाही. पार्किंग पॉलिसीचे काय झाले हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.

कचऱ्याची दुर्गंधी : रस्त्यावर गाड्या, डंपिंग ग्राउंड यामुळे वॉर्डात आरोग्याचे प्रश्न गंभीर बनताहेत

​​​​​​​ट्रान्सफर कनेक्टवि्हिटीद्वारे कचरा डंपिंगपर्यंत नेला जातो असे अधिकारी सांगतात. मात्र प्रत्यक्षात तसे होत नाही. रमानगरसह अनेक भागात कचऱ्याचे ढीग लागतात. कचरा गाड्या रस्त्यावरच उभ्या असतात. त्यामुळे या भागात दुर्गंधी व आराेग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हा त्रास बंद झाला नाही तर कोणताही नगरसेवक आपल्या भागात कचरा साठवण्यासाठी जागा मिळवून देणार नाही.

दूषित पाणी : अधिकारी लक्ष देत नाहीत, गणवेश मिळत नाहीत

आमच्या वाॅर्डात २० मिनिटे पाणी येते, तेही बराच वेळ दूषितच सोडले जाते. त्यामुळे लोक आजारी पडत आहेत. बालवाडीत मुलांना गणवेश मिळत नाही. आरोग्य सुविधाही मिळत नाहीत, अधिकारी फोन घेत नाहीत.

रस्ते अडचणीचे : घरात पाणी जात असल्याने वॉर्डातील लोक त्रस्त

वाॅर्डात सिमेंट रस्ता करताना त्याची उंची वाढवण्यात आली. त्यामुळे १०० ते १५० घरांमध्ये पाणी शिरत आहे. पावसाळ्यात हा माेठा त्रास सहन करावा लागला. पाइप लावून पाणी काढण्याची वेळ येतेे. याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे.

नाले अर्धवट : ५ आयुक्त बदलले तरी आमची कामे अजून होईनात

​​​​​​​माझ्या कारकीर्दीत पाच मनपा आयुक्त बदलले पण आमच्या वॉर्डातील नाल्याचे काम झालेले नाही. अजूनही ५० टक्के काम बाकी आहेत. तातडीने हे काम पूर्ण करून दुर्गंधीपासून लाेकांची सुटका करावी, अशी मागणी आहे.

उद्याने भकास : बॉटनीकल गार्डनकडे कुणीच लक्ष देत नाही

सिडकाे एन-८ भागातील बॉटनिकल गार्डन या भागातील सर्वात मोठे उद्यान आहे. पण याकडे कुणीच लक्ष देत नाही. कंपाउंड वॉल पडलेली आहे. प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन दुरवस्था दूर करावी, अशी मागणी आहे.

बातम्या आणखी आहेत...