आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
ऊसाने भरलेला ट्रॅक्टरच्या मागील ट्रेलरमध्ये कार घुसल्याने कारमधील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून, इतर तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री भेंड खुर्द नजिक माजलगाव पाथर्डी राष्ट्रीय महामार्गावर घडली. तसेच, दुसऱ्या एका अपघातात उभ्या ट्रेलरला दुचाकी धडकल्याने एक ठार झाला आहे. सदरील घटना सिरसदेवी येथे घडली.
बनवस(जिल्हा परभणी) येथील कुटुंब नातलगाच्या विवाह सोहळ्याला औरंगाबाद येथे (एम एच 24 व्ही- 9257) कारने निघाले असताना भेंड खुर्द नजिक समोर ऊसाने भरुन चाललेल्या ट्रॅक्टरच्या मागील ट्रेलरमध्ये कार घुसल्याने कारमधील व्यकंट विश्वनाथ बल्लोरे(वय 60) सुलोचना व्यंकट बल्लोरे (वय 50)हे पती-पत्नी जागीच ठार झाले. तर अहिल्याबाई बापुराव बल्लोरे,प्रताप अंकुश नळगिरे आणि एक पाच वर्षीय बालक जखमी झाले. जखमीना पुढील उपचारार्थ बीड येथे हलविण्यात आले तर अपघातात ठार झालेले पती-पत्नी यांचे मृतदेह जातेगाव येथील प्राथमीक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यास दाखल करण्यात आले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.