आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:टीईटी परीक्षेच्या अर्जासाठी 5 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ, 10 ऑक्टोबर रोजी घेतली जाणार आहे परीक्षा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिक्षक पदासाठी टीईटी बंधनकारक असल्याने 2013 पासून राज्यात परीक्षा घेतली जाते.

शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेण्यास राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतर परीक्षा परिषदेने परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले. 10 ऑक्टोबर रोजी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया 25 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती. अर्जासाठी मुदतवाढ देण्यात आली असुन 5 सप्टेंबरपर्यंत डीटीएड, बीएडधारकांना अर्ज भरता येणार आहेत.

शिक्षक पदासाठी टीईटी बंधनकारक असल्याने 2013 पासून राज्यात परीक्षा घेतली जाते. कोरोना पार्श्वभूमीवर 2019 पासून परीक्षेचे नियोजन राज्य परीक्षा परिषदेला करता आलेले नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव काहिसा कमी झाल्याने परिषदेने याबाबत सरकारकडे विचारणा केली होती. परीक्षा घेण्यास राज्य सरकारने नुकतीच मान्यता दिली. त्यानंतर परिषदेने वेळापत्रक जाहीर केले. प्राथमिक (शिक्षक पात्रता परीक्षा पेपर-१) व माध्यमिक स्तरावर (शिक्षक पात्रता परीक्षा पेपर-२) परीक्षा घेतली जाते. परीक्षेसंदर्भातील ऑनलाइन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहिती http://mahatet.in या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...