आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेळापत्रक जाहीर:इग्नुच्या चार अभ्यासक्रमांना नव्या शैक्षणिक सत्रापासून सुरुवात, 31 जुलैपर्यंत अर्ज नोंदणीसाठी मुदत

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या नव्या शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली आहे. प्रवेश नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यंदा चार नव्या अभ्यासक्रमांना सुरुवात करण्यात येत आहे. याबरोबरच एआयसीटीने इग्नु अंतर्गत एमबीएसाठी देशभरातील 1 लाख तर एमसीएसाठी 20 हजारहून अधिक जागा वाढवण्याची मान्यता दिली असल्याची माहिती गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सहाय्यक प्रादेशिक संचालक डॉ. सौनंद साेमासी यांनी दिली.

डॉ. सोमासी यांनी सांगितले की, पदव्युत्तरसह अन्य काही अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यात यंदा एम.ए. अर्बन प्लानिंग अ‌ॅण्ड डेव्हलप्मेंट अर्बन स्टडीज, एम.ए. सीएसआर, एम.ए. पर्यावरणीय आरोग्य, एम.ए. श्याश्वत विज्ञान आदींचा समोवश आहे. तर सध्या बारामती येथे फुड सेफ्टी अ‌ॅण्ड क्वॉलिटी हा विषय देखील सुरु करण्यात आला आहे. लवकरच याची सुरुवात अन्य इग्नु केंद्रातही करण्यात येईल, असेही डॉ. सोमासी यांनी सांगितले. याबरोबरच यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून एमबीए आणि एमसीएसाठीच्या प्रवेश क्षमतेत वाढ करण्यात आली आहे.

एआयसीटीईकडे जागा वाढविण्यासंबंधी प्रस्ताव देण्यात आला होता. त्याला मंजूरी मिळाली असून, देशभरात एमबीएच्या एक लाख तर एमसीएच्या 2 हजार हून अधिक जागा वाढणार आहेत. इग्नु हे नेहमीच समाजोपयोगी आणि गुणवत्तेवर भर देत आले आहे. त्यानुसार अभ्यासक्रम तयार करण्याबरोबरच गुणवत्तापूर्ण अभ्यासक्रमाचे साहित्य देखील उपलब्ध करुन देत असल्याचेही डॉ. सोमासी यांनी सांगितले. आतापर्यंत एमबीएसाठी प्रवेशपूर्व परीक्षा होत असे ती आता असणार नाही, असेही त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस प्रो. कनिज फातेमा, डॉ. नवीद उस-सहर, डॉ. सोहेल जकीयोद्दीन, डॉ. फहीमीना नाज मराठवाडा कॉलेज ऑफ एज्युकेशनचे कर्मचारी यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...