आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तक्रार:अतिक्रमण केल्याने ग्रामपंचायत सदस्यत्व रद्दचा निर्णय कायम

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

औसा तालुक्यातील शिवणी (बु.) येथील मागासवर्गीय समाजाच्या गावठाण जमिनीवर अतिक्रमण केल्याने लक्ष्मण श्रीकृष्ण जाधव यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केले होते. त्याविरोधातील विभागीय आयुक्तांकडील अपीलही फेटाळले. सदस्यत्व रद्दचा निर्णय कायम ठेवला. प्रकरणात माजी सरपंच तानाजी घोडके यांनी तक्रार दिली होती. घोडके यांच्या वतीने अॅड. विक्रांत वलसे यांनी बाजू मांडली. २०२१ मध्ये झालेल्या निवडणुकीत खुल्या प्रवर्गातून निवडणूक लढवली होती. शिवणी येथील जुने गावठाण मागासवर्गीयांना दिले होते. संबंधित गावठाण जाधव कसत असल्याची तक्रार होती. याबाबत गावातील नागरिकांनी जाधव आणि त्यांच्या मातोश्री रुक्मिणीबाई यांच्या विरोधात दावा दाखल केला होता. उपअधीक्षकांनी मोजणी करून नकाशा तयार केला होता. यात २५ आर जमिनीवर अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाले होते.

बातम्या आणखी आहेत...