आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविद्यापीठाचा दिक्षांत समारंभ होऊनही पदवी प्रमाणपत्र घेऊन न जाणाऱ्यांना प्रमाणपत्र मिळवण्यासाठी दंडाची रक्कम भरावी लागत होती. आता विद्यापीठाने दंडाची रक्कम माफ करत केवळ 350रुपयांत पदवी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. 5 जुलै 2022पर्यंत विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्या संदर्भातील सूचनापत्र विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाने जारी केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात दरवर्षी लाखभर विद्यार्थी पदवी, पदव्युत्तरचे शिक्षण घेऊन बाहेर पडतात. शिक्षण घेतल्यानंतर त्यांना पदवी प्रमाणपत्र देण्यात येते. परंतु, अनेक विद्यार्थी विहित मुदतीत दीक्षांत समारंभानंतर पदवी प्रमाणपत्रसाठी अर्ज करत नाही. अशा विद्यार्थ्यांना उत्तीर्ण वर्षासाठी 100रुपये तर पुढील वर्षापासून प्रती वर्ष 50 रुपयांचा दंड विद्यापीठ आकारते. सध्या विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाच्या निवडणुकीची पदवीधर नोंदणी सुरू आहे. या नोंदणीमध्ये पदवी प्रमाणपत्र गरजेचे आहे. पदवीधर नोंदणीच्या अनुषंगाने विलंब शुल्क माफ करण्याची मागणी विविध विद्यार्थी संघटनांनी केली होती. या मागणीच्या अनुषंगाने कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी ज्या विद्यार्थ्यांनी आजपर्यंत पदवी प्रमाणपत्र घेतलेले नाहीत, अशा विद्यार्थ्यांना विशेष बाब म्हणून 5जुलै 2022 पर्यंत पदवी प्रमाणपत्र अर्ज सादर करण्यासाठी मान्यता दिली आहे. अर्जदारांना 250 रुपये व एकत्रित दंड 100 रुपये असे एकुण 350रुपये भरून पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.