आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंबेडकरवादी संघर्ष समितीची मागणी:विद्यापीठ विभाजनाच्या विरोधात राज्य सरकारने भूमिका स्पष्ट करावी

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विभाजनाविरोधात आंबेडकरी पक्ष संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शासनाने भूमिका जाहीर करावी अन्यथा नामांतर आंदोलनाच्या धर्तीवर आंदोलन उभे करण्यात येईल. असा इशारा आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या वतीने कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांना देण्यात आला आहे. संजय निंबाळकरांची व्यवस्थापन परिषद सदस्यपदावरून हकालपट्टी करावी, उच्चशिक्षण सहसचिव प्रकाश बच्छाव समिती बरखास्त करावी आदी मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या आहेत.

विद्यापीठाचे विभाजन करून उस्मानाबाद येथील उपकेंद्रात स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्यासाठी राज्य सरकारने प्रकाश बच्छाव समिती गठित केली आहे. या समितीने मागील महिन्यात उस्मानाबाद उपकेंद्राला भेट देऊन पाहणी केली होती. संजय निंबाळकर यांचा त्यासाठी अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. पण नामांतर शहिदांनी बलिदान करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव विद्यापीठाला दिले आहे. त्यामुळे शहिदांचा अवमान करून विभाजन करण्यास आंबेडकरवादी संघटनांचा विरोध आहे. त्यामुळे त्यांनी आंदोलन पुकारले आहे. आजही आंबेडकरवादी संघर्ष समितीने विद्यापीठात आंदोलन केले. विद्यापीठ विभाजनाबाबत शासनाने भूमिका स्पष्ट करावी अशा आशयाचे निवेदन त्यानंतर कुलगुरूंना देण्यात आले आहे.

आंदोलकांत तरूणाईचा समावेश

श्रावण गायकवाड, विजय खंडागळे, श्रीरंग ससाणे, भागतराज भालेराव, आनंद कस्तुरे, वंचितच्या नेत्या शमीभा पाटील, बाळू गंगावणे, वसंत वक्ते, सचिन निकम, बलराज दाभाडे, नानासाहेब म्हस्के, बाळू वाघमारे, गुणरत्न सोनवणे, दीपक निकाळजे, शैलेंद्र मिसाळ, राहुल वडमारे, पवन पवार, नवल सूर्यवंशी, मनीष नरवडे, अतुल कांबळे, अतुल खरात, राहुल मकासरे, विकास रोडे, स्वप्नील शिरसाठ, सिद्धार्थ मोरे, भागवत चोपडे, संदीप तुपसमुद्रे, लोकेश कांबळे, अमोल खरात, विजय जाधव, कैलास काळे, अमोल होर्शीळ, अजय गाडे, अमोल भालेराव, सचिन तिवारी, किरण तुपे, क्षितिज नितनवरे, शैलेश लांडगे, जयश्री शिरके, हेमत खोतकर, सूर्यवंशी, संजय म्हस्के, गौतम भिसे आदींसह तरूण कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...