आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जायकवाडी धरणातून आजही विसर्ग सुरु:जायकवाडीचा विसर्ग आता एक फुटावर

पैठण6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जायकवाडी धरणाच्या मुख्य १८ गेट्समधून मंगळवारी सुरू करण्यात आलेला पाण्याचा विसर्ग आजही सुरू असून बुधवारी सकाळी दीड फुटावर असलेले गेट्स गुरुवारी एक फुटावर करण्यात आले. यातून २०,४५३ क्युसेक वेगाने नदीपात्रात विसर्ग करण्यात येत असल्याची माहिती अभियंता विजय काकडे यांनी दिली. मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा सलग शंभर टक्क्यांजवळ आला असून यंदा तर जुलै महिन्यातच धरणाच्या मुख्य गेट्समधून पाणी गोदावरीत सोडावे लागले आहे. सध्या ही १७,८०० क्युसेक पाण्याची आवक सुरू असल्याचे अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...