आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली कोरोना:जिल्हयाने कोरोना बाधितांची गाठली शंभरी, भिरडा येथील तरुण पॉझीटिव्ह

हिंगोलीएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • गावात आरोग्य पथकाकडून सर्वेक्षणाचे काम सुरु

जिल्हयाने कोरोनाबाधीतांची शंभरी गाठली असून हिंगोली तालुक्यातील भिरडा येथील एक 23 वर्षीय तरुण कोरोना पॉझिटीव्ह आला अाहे. याबाबतचा अहवाल बुधवारी (ता.20) शासकिय रुग्णालयास प्राप्त झाला आहे. त्यानंतर आता आरोग्य विभागाने तातडीने गावात धाव घेऊन सर्वेक्षणाचे काम सुरु केले आहे. त्या तरुणाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना विलीगीकरण कक्षात दाखल केले जाणार आहे.

हिंगोली जिल्ह्यात आता पर्यंत कोरोनाबाधीतांची संख्या 99 झाली होती. त्यानंतर आज भिरडा येथील तरुणाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे कोरोनाने शंभरी गाठली आहे. मात्र त्यापैकी 15 कोरोनाबाधीत रुग्ण आयसोलेशन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहेत. तर उर्वरीत 85 जणांची प्रकृती चांगली झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.

दरम्यान, वसमत तालुक्यातील 8 मजूरांसोबत भिरडा येथील 3 जण आले होते. 14 मे रोजी या 8 जणांना वसमतच्या विलगीकरण कक्षात दाखल केल्यानंतर भिरडा येथील तिघे जण आपल्या गावी आले होते. मात्र वसमत येथील 8 जण पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यासोबत आलेल्या भिरडा येथील तिघांसह त्यांच्या कुटुंबातील एकूण 15 जणांना विलीगीकरण कक्षात दाखल केले होते. त्या 15 जणांचे स्वॅब नमुने तपासणीला पाठविले होते. त्यापैकी एकाचा अहवाल प्राप्त झाला असून तो पॉझीटिव्ह आला आहे. या प्रकाराची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. किशोर श्रीवास, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. गोपाल कदम, डॉ. संजीवन लखमावार यांनी जिल्हा परिषद आरोग्य विभागाला कळविली आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी राधा बिनोद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नामदेव कोरडे  यांच्यासह वैद्यकिय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांनी गावास भेट दिली आहे. संपूर्ण गावात सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. त्या व्यक्तींचा गावात कोणाशी संपर्क आला याची शाहनिशा केली जात असल्याचे आरोग्य विभागाच्या सुत्रांनी सांगितले.

भिरडा गाव सील केले ः डॉ. शिवाजी पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी हिंगोली

तालुक्यातील भिरडा गाव सील करण्यात आले आहे. त्यानंतर या ठिकाणी आरोग्य सर्वेक्षण सुरु असून कोणालाही गावातून बाहेर जाण्याची तसेच गावात येण्याची परवानगी दिली जाणार नाही. संपूर्ण गावात सर्वेक्षणासाठी 25 पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

बातम्या आणखी आहेत...