आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठी दुर्घटना:ड्रेनेजसाठी तीन महिन्यांपासून खोदलेले खड्डे अखेर बुजवले

वाळूजएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या तीन महिन्यांपासून बजाजनगरातील हायटेक महाविद्यालय व रुग्णालय परिसरात ड्रेनेजसाठी खोदून ठेवलेल्या खड्ड्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या एमआयडीसी प्रशासनाचे लक्ष वेधत ‘दैनिक दिव्य मराठी’ने सविस्तर वृत्त १७ डिसेंबर रोजी प्रकाशित केले होते. एमआयडीसी प्रशासनाने त्या वृत्ताची दखल घेत हे धोकादायक खड्डे तत्काळ बुजवून टाकले.

ठेकेदाराने सप्टेंबर महिन्यात राजा शिवाजी शाळा, महाविद्यालय, हायटेक अभियांत्रिकी विद्यालय तसेच हॉस्पिटलमध्ये ये-जा करण्याच्या मुख्य मार्गावर ३ फूट खोल आणि ४ फूट रुंदीचे खड्डे ड्रेनेजलाइनच्या कामासाठी खोदून ठेवले होते. तीन महिन्यांपासून या धोकादायक खड्ड्यांत पाणी साचल्याने अनेक नागरिक घसरून त्यात पडून जखमी झाले होते. या खड्ड्यांमुळे भविष्यातही मोठी दुर्घटना घडू शकते, असे ‘दिव्य मराठी’ने निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर एमआयडीसी प्रशासनाने संबंधित ठेकेदाराच्या मदतीने जेसीबीने १७ डिसेंबर रोजी खड्डे बुजवले. त्यामुळे परिसरातून ये-जा करणारे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

बातम्या आणखी आहेत...